Monday, May 5, 2014

किस्से गायतोंडे यांच्या ( अद्याप न मिळालेल्या ) चित्रांचे ……

एकदा …
: मी सतीश नाईक बोलतोय ?
: बोला
: ओळखलं का? प्रफुल्लाबाईंसोबत अनेक वेळा भेटलोय आपण
: होय ,होय …. ओळखलं ., बोला ,बोला काय काम काढलंत? 
: 'चिन्ह 'नावाचं एक आर्ट मेगेझीन प्रसिद्ध करतो मी.

: ऐकलं आहे त्या विषयी मी.
: लवकरच ' गायतोंडे ' यांच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध करतोय
: मग ?
: तुमच्या संग्रहात ' गायतोंडे ' यांचं एक पेंटिग आहे हे मला ठाऊक आहे
: बरं मग ?
: मला त्याची इमेज द्याल का ? मी ती या पुस्तकात प्रसिद्ध करू इच्छितो
: ……………………
: गायतोंडे ' यांच्यावरचं हे पाहिलंच पुस्तक आहेआम्ही केलेला एकमेव अंक खूप गाजला होतात्यांची जास्तीत जास्त पेंटिग्ज मिळवायचा प्रयत्न करतोयद्याल का तुम्ही ?
विचार करून सांगतेबाय .

दुसऱ्यांदा 
: सतीश नाईक बोलतोय
: विचार चालू आहे . ठरलं का सांगते . कळवते .
: ओके

तिसऱ्यांदा 
: काही ठरलं का? देताय नां
: नाही अजून काही ठरत नाही ….
: का हो ?
: नाही , पण काय होणार ? , लोकांना ते कळलं की मला त्रास द्यायला सुरवात करणार, मग सारखं सारखं ते पाहायला कुणी ना कुणी येत राहणार . मला तो व्याप होऊन बसणार. ते एक वेळ सहन करता येईल , पण नंतर ' बेचनेका हॆ क्या ' वाले सारख्या सारख्या विचारणा करून पिडतील त्यांचं काय ? अरे मला सांग, गायचं पेंटिग आपण काय विकायला घेतलं कारे ? आता गायच्या चित्रांच्या किमती कायच्या काय वाढत चालल्या आहेत.  ही लोकं स्वस्थ बसून देतील मला? अरे हा त्रास भयंकर असेल.
: तुम्ही म्हणताय ते पटतंय , पण मला ते पेंटिंग पुस्तकात हवंच आहे ….
:पाहते , ठरलं का सांगते ?

मी अजूनही वाट पाहतोय. गायतोंडे पुस्तक प्रसिद्ध व्हायला का एव्हडा उशीर होत गेला ते कळलं आता.
पण मी चिकाटी सोडत नाही, मी अजूनही वाट पाहतोय,
मराठीत नाही जमलं म्हणून काय झालं, इंग्रजी आवृत्तीसाठी मी ते नक्की मिळवणार आहे.

No comments:

Post a Comment