Saturday, August 3, 2013


गायतोंडेंच्या शोधात...ग्रंथात लक्ष्मण श्रेष्ठ!


‘निवडक चिन्ह’ मालिकेतला पहिला खंड म्हणजे ‘गायतोंडेंच्या शोधात’...हा ग्रंथ आता निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलाय. गायतोंडे यांच्या चित्रांची असंख्य नवी नवी छायाचित्रं रोजच हाती येत आहेत. काय घ्यायचं आणि काय ठेवायचं यावरून नुसता गोंधळ उडतो आहे. पण एवढं मात्र आम्ही छातीठोकपणानं आणि आत्मविश्वासानं सांगतो की मराठीत आजवर कुणीच प्रसिद्ध केला नसेल अशा जबरदस्त ग्रंथाच्या निर्मितीत आम्ही व्यग्र आहोत हे निश्चित समजा. चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांची मुलाखत पूर्ण झाली आहे. आपल्या गुरूंविषयी-गायतोंडे यांच्याविषयी लक्ष्मण विलक्षण भारावून बोलले आहेत. लक्ष्मण यांचा हा लेख ‘गायतोंडेंच्या शोधात’... या ग्रंथाचं खास आकर्षण ठरेल या विषयी आमच्या मनात तरी दुमत नाही

सबकुछ ‘गायतोंडे’!


‘भारतात दोनच जिनियस चित्रकार आहेत एक बरवे आणि दुसरे गायतोंडे’ असं विधान दस्तुरखुद्द चित्रकार मकबुल फिदा हुसेन यांनी केलं होतं, आणि ते खूप गाजलं होतं. यातले ‘गायतोंडे’ म्हणजे ‘चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे’. यांच्यावर गेल्या एक तपाच्या काळात ‘चिन्ह’नं तीन वेळा विशेष लेखन प्रसिद्ध केलं. 

एकदा २००१ साली आणि दुसर्‍यांदा २००६ साली तर तिसर्‍यांदा २००७ साली. हे सर्व लेखन आता कॉफी टेबल बुकच्या रूपानं एकत्र प्रसिद्ध होणार आहे. खेरीज याच ग्रंथात अनेक नवे लेख असणार आहेत. ‘गायतोंडे यांचा अनेक अंगानं घेतलेला शोध हे या ग्रंथाचं खास आकर्षण ठरणार आहे. आणि हो महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथाला चित्रकार प्रभाकर कोलते यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे.

लोकांचंही अडू शकतं


लोकांचंही अडू शकतं


एक असं माणूस जे जगावर रुसलं आणि रुसूनच बसलं.आधी घरच्यांना वाटलं,'चssट येईल,जाईल कुठं?पण अं हं.मग कुणी काही कुणी काही प्रयत्न केले.पण नाहीच सगळे ते उपयोगाला आले.शेवटी लोकं म्हणली,काय करणार?आणि ती लागली आपापल्या कामाला.


जाता जाता खूप वेळ गेला.मग त्यानं आणि लोकांनी दिलं सोडून एकमेकाला.एव्हढं असेल तर बसच.दोघांनी ठरवलं.त्यानंही आणि लोकांनीही.कुणाचंच काही अडेना.ना लोकांचं,ना ह्याचं.या समाजप्रिय प्राण्यांच्या जगात एकमेकांवाचून न अडणंच महत्वाचं ठरलं आणि हा आपल्या-आपल्यात आणि लोकं त्यांच्या-त्यांच्यात असंच झालं.त्यांनीही हे बरोबर व्हावं म्हणून खूप काय-काय केलं.आपापल्या परीनं सगळं करून पाहिलं.पण नाही जमलं काही.सगळं हुकतच गेलं.ह्या सगळ्यात एक मात्र झालं,"लोकांचंही अडू शकतं,हे यातून स्पष्टच झालं."

एक आख्खं आयुष्य आपल्यात असं जगून गेलं.आपल्याला जसं वाटतंय ना हे बरोबर नाही झालं,तसंच त्यावेळीही काहीजणांना मनापासून वाटलं.


                                                                      वासुदेव गायतोंडे एक 'मिथ' बनून राहिलं!!




विक्षिप्त हात होता त्याचा, फक्त दोनच रेघा होत्या त्याच्या हातावर!



"गायतोंडेला मी तोंडावर सांगायचो...",10 वर्ष टेल्कोचे पब्लिसिटी हेड त्यानंतर 13 वर्ष एअर इंडियाचे डेप्युटी डायरेक्टर पब्लिसिटी अशी पदं भूषवलेले आणि या सगळ्यापेक्षा आधी गायतों
डेंचे विद्यार्थी आणि नंतर गायतोंडेंचे मित्र असल्याचा अभिमान बाळगणारे सच्चिदानंद दाभोळकर त्यांच्या गायतोंडे यांच्यावरच्या ‘चिन्ह’मधल्या लेखात सांगतात, मी त्याला म्हणायचो, "तुझा हातच विक्षिप्त आहे. त्याला तू तरी काय करणार आणि मी ही. होताच त्याचा हात विक्षिप्त. आपल्या हातावर कशा तीन तीन मुख्य रेघा असतात line of heart, line of head and line of life, याच्या हातावर फक्त दोनच रेघा. तिसरी रेघच नाही. आता असल्या हाताला विक्षिप्त नाही म्हणायचं तर काय म्हणायचं काय? असं असलं तरी की म्हणूनच पण त्याच्या हातात विलक्षण जादू होती. त्याचं बेसिक जबरदस्त पॉवरफुल होतं. त्याच्या पक्क्या ग्रामर मुळेच तर तो फिगरेटिव्हकडून अ‍ॅबस्ट्रॅक्ट्कडे वळला तरी त्याचं अ‍ॅबस्ट्रॅक्ट भाव खाऊन गेलं."


गायतोंडे या कलावंताच्या कलाकॄतींचं त्यांच्या कलंदर आयुष्याचं गूढ प्रत्येक भारतीय चित्रकाराला आव्हानात्मक वाटत आलंय. ‘चिन्ह’नं आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या कलातपस्वींना मानवंदना देण्यासाठी एक संकल्प सोडलाय. या रौप्यमहोत्सवी वर्षात गायतोंडे यांच्यावर एक कॉफीटेबल बुक प्रकाशित करायचं. त्यांची 40 हून अधिक पेंटिंग्ज आणि गायतोंडेंवर मान्यवरांचे लेख आणि ‘चिन्ह’ची दॄष्ट लागावी अशी निर्मिती असणारं हे पुस्तक म्हणजे प्रत्येक कलारसिकासाठी पर्वणीच ठरणार आहे.



आपली प्रत आजच बुक करण्यासाठी आपल्या मोबाईलवरून 'NKG' असा एक sms आपल्या नाव-पत्ता-ईमेल आयडीसह ‘चिन्ह’च्या '9004034903 या मोबाईल क्रमांकावर आत्ताच पाठवून द्या, किंवा 
http://www.chinha.in/english/nivadakbooking.php या लिंकवर क्लिक करून आपण आपली नोंदणी ऑनलाईनही करू शकता.
‘गायतोंडे’ एक गुढ

‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी चित्रंही रंगवित नाही आणि बोलतंही नाही. पण त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी चित्रं रंगवित नाही कारण मला ते करायची आता गरज वाटत नाही. पण मी बोलतही नाही. कारण मला शांतता प्रिय आहे. या दो

न्ही गोष्टी सारख्या नाहीत. मी लोकांमध्ये मिसळत नाही.”

आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल इतकं त्रयस्थपणं बोलू शकणारे एकमेव अद्वितीय म्हणजे गायतोंडेच. चित्रकार किंवा कलाकार जगाशी कसा संबंध ठेवू शकतो याचं एक आगळं वेगळं उदाहरण आहे हे. गायतोंडेंचं काम, त्यांच्याबद्दलचं उपलब्ध साहित्य सगळं एकत्र घेऊन येतेय ‘चिन्ह’. उत्तम छ्पाई, गायतोंडेंची 40 हून अधिक पेंटिंग्ज असं हे कॉफी टेबल बुक. प्रत्येक मराठी वाचकाकडेच नव्हे तर प्रत्येक चित्ररसिकाकडे असायलाच हवा असा हा "गायतोंडे खजिना".

‘गायतोंडे’ यांची असंख्य रंगीत चित्रं आणि त्यांच्याविषयीचे सर्वच लेख असलेल्या या ग्रंथाची किंमत आहे रु. २०००. विद्यार्थी आणि चित्रकारांना मात्र विशेष सवलत म्हणून हा ग्रंथ १२०० रुपयांना उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी 90040 34903 या नंबरवर 'NKG INFO' असा sms पाठवा. 
 किंवा 
http://www.chinha.in/english/nivadakbooking.php या लिंकवर क्लिक करूनही आपल्याला ऑनलाईन ग्रंथ बुक करता येईल.

किशोरी दास
गायतोंडे आणि त्यांची सख्खी बहिण !

‘गायतोंडेच्या शोधात’ हा अंक जेव्हा ‘चिन्ह’नं २००६ साली प्रसिद्ध केला तेव्हा त्यातला सर्वात गाजलेला लेख होता तो त्यांच्या बहिणीचा. ‘किशोरी’ हे त्यांचं माहेरचं नाव. ‘किशोरी गायतोंडे’. ‘गायतोंडे’ यांची ती धाकटी बहिण. ‘गायतोंडे दिल्लीला निघून गेले तेव्हा ‘किशोरी’ खूप लहान होती. पण वडिलांच्या निधनानंतर तिनंच वासुदेव गायतोंडे यांच्या पश्चात आईचा संभाळ केला. घर चालवलं. पण गायतोंडे मात्र आपल्या आवडत्या धाकट्या बहिणीला नंतर सतत टाळतच राहिले. इतकंच काय पण आई गेल्यावरसुद्धा ते मुंबईत आले नाहीत. जणू आपल्या भोवतालचे सारेच्या सारे पाश त्यांनी तोडले होते. त्या गायतोंडे यांच्या या सख्ख्या बहिणीचं हे आत्मकथन तेव्हा खूपच गाजलं. ‘असं होऊ शकतं!’, ‘असं होऊ शकेल!’ अशा नानाप्रकारच्या प्रतिक्रिया तो लेख वाचल्यावर अनेकांच्या मनात उमटल्या होत्या. त्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही देत आहोत. ‘होय ! जे घडलं ते असंच होतं. हे खरंच आहे. अगदी खरं’. किशोरी गायतोंडे-दास यांचा हा लेख वाचायचा असेल तर इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%203rd.pdf

हा लेख आता ‘निवडक’च्या आगामी ‘गायतोंडे’ खंडात घेण्यात आला आहे. त्या विषयी जाणून घ्यायचे असेल तर इथं क्लिक करा
http://www.chinha.in/promo/Nivdak_grp.pdf

‘गायतोंडे’ यांची असंख्य रंगीत चित्रं आणि त्यांच्याविषयीचे सर्वच लेख असलेल्या या ग्रंथाची किंमत आहे रु. २०००. विद्यार्थी आणि चित्रकारांना मात्र विशेष सवलत म्हणून हा ग्रंथ १२०० रुपयांना उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी 90040 34903 या नंबरवर 'NKG INFO' असा sms पाठवा. किंवा 
http://www.chinha.in/english/nivadakbooking.php या लिंकवर क्लिक करूनही आपल्याला ऑनलाईन ग्रंथ बुक करता येईल.
गायतोंडे म्हणतात....

हुसेननं गायतोंडे यांना एकदा सांगितलं "Gai, if I had your talent, I would turn the world upside down!" पण गायनं मख्खपणे सांगितलं "I like the world as it is!" पण गायतोंडे यांना हुसेनविषयी प्रेम आणि कौतुक होतं. ते त्यांच् या प्रचंड आणि अव्याहत निर्मितीक्षमतेकडे कौतुकानं पाहत.

‘चिन्ह’तर्फे होणार्‍या आगामी चित्रकार गायतोंडे या ग्रंथातून. अधिक माहितीसाठी 90040 34903 या मोबाईलवर 'NKG' एवढाच sms स्वत:च्या नाव, पत्ता, इमेल आयडीसह पाठवा.

सारेच्या सारे ‘गायतोंडे’ ग्रंथाविषयी



चित्रकार वासुदेव सन्तू गायतोंडे यांच्यावरचा ‘चिन्ह’चा आगामी ग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात प्रसिद्ध होणार आहे. त्यासंबंधीची माहिती देणारी एक मालिका ‘चिन्ह’नं नुकतीच फेसबुकवर प्रसारित केली होती. तिला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ज्यांना या मालिकेविषयी सांगोवांगीतून कळले त्यांनी ‘चिन्ह’कडे यासंबंधी विचारणा केली. म्हणूनच ज्यांचा फेसबुकवर अकाऊं नाही अशांसाठी ही संपूर्ण मालिका आम्ही येथे पुन्हा प्रसारित करीत आहोत. वाचकांनी यावर प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. 


‘चिन्ह’चं ‘गायतोंडे’ येतंय.

बरवे गेले तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला
प्रतिक्रिया देताना चित्रकार हुसेन म्हणाले होते की
There are only two genius painters.
One was Barwe and the other, is Gaitonde.
And that is the truth.
बरवे, गायतोंडे यांच्या पाठोपाठ हुसेनही आता
आपल्यातून निघून गेले आहेत.
पण त्यानं केलेलं ते स्टेटमेंट मात्र अजरामर झालंय...
ज्यानं हे स्टेटमेंट केलं त्या हुसेनवर आजवर
अक्षरश: शेकड्यानं पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत.
भविष्यातही होतील.
पण प्रत्यक्ष हुसेननं ज्याना जिनियस मानलं त्या
प्रभाकर बरवे आणि गायतोंडे यांच्या निधनाला
आता अनुक्रमे १६ आणि १० वर्ष पूर्ण झाली.
पण त्यांच्यावर मात्र अद्याप एकही पुस्तक प्रसिद्ध झालेलं नाही.
म्हणूनच आता ‘चिन्ह’नं हे आव्हान स्वीकारलंय.
लवकरच ‘चिन्ह’तर्फे चित्रकार गायतोंडे यांच्यावरचं
संपूर्णपणे आर्ट पेपरवर छापलेलं.
संपूर्णत: रंगीत असणारं कॉफी टेबल बुक
लवकरच प्रसिद्ध होतंय.
कधी, कुठे, कसं? किंमत काय वगैरे प्रश्नांची
उत्तरं मिळवण्यासाठी पुढील पोस्टकडे लक्ष ठेवा.




पुनश्च ‘गायतोंडे’

‘गायतोंडे’ यांच्यावरील पुस्तकाच्या तयारीच्या निमित्ताने ‘चिन्ह’च्या या संकेतस्थळावरील ‘गायतोंडे‘ यांच्या विषयीचा सर्वच मजकूज आम्ही काढून घेतला होता. त्यामागचा हेतू हा होता की ‘गायतोंडे’ यांच्यावरील पुस्तकाची तयारी करताना काय ठेवावं? काय काढावं? काय नवं ठेवावं? या विषयी निर्णय घेणं सोपं जावं. संकेतस्थळावर ‘गायतोंडे‘ यांच्या विषयीचे सर्वच लेख ठेवल्यास पुस्तकाच्या विक्रीवर परिणाम होईल या भयानं आम्ही लेख काढून घेतले असा गैरसमज करून घेऊ नये. सदर पुस्तकाची निर्णय प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे त्यामुळे काढून घेतलेले सर्वच लेख आता ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर आता पुन्हा उपलब्ध आहेत. ‘चिन्ह’च्या वाचकांना त्रास झाला असल्यास आम्ही दिलगीर आहोत.
‘गायतोंडे’ यांच्यावरचं ‘चिन्ह’चं महत्त्वाकांक्षी पुस्तक आता मार्च महिन्यात प्रसिद्ध होईल. ‘चिन्ह’मधील लेखांखेरीज अनेक नव्या लेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. खाजगी संग्रहाकांच्या संग्रहात असलेली चित्रं या निमित्तानं पहिल्यांदाच कलारसिकांना पहाता येणार आहेत. या पुस्तकांची पानं किती? आकार कोणता? किंमत किती? सवलत वगैरे काही आहे का? या तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी निश्चितपणानं मिळतील. तेव्हा आणखी थोडी कळ काढा.



‘गायतोंडे’ फिल्म आणि पुस्तकाविषयी

दि. १ डिसेंबर रोजी ‘गायतोंडे’ यांच्यावरील पुस्तकाची घोषणा होताच प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पडला. सार्‍यांनीच या कल्पनेचं प्रचंड उत्साहानं स्वागत केलं. अ‍ॅडव्हान्स बुकींग करून घेण्याच्याही सूचना आल्या त्याला होकार देताच अवघ्या तासाभरात १० प्रती बुकही झाल्या. निखिल सहाणे यांची आलेली प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती म्हणून तिला हे जाहीर उत्तर.

सुनील काळदाते यांनी ‘गायतोंडे’ यांच्यावर बनवलेल्या फिल्मला आता जवळ जवळ १५-१६ वर्ष उलटून गेली आहेत. जगभरच्या फिल्म फेस्टीवल आणि एनसीपीए मधल्या शो नंतर ती फिल्म जगात कुठेही दाखवली गेलेली नाही. ही फिल्म ज्या काळात बनवली गेली त्या काळातलं तंत्रज्ञानही आता जुनं झालं आहे. नव्या तंत्रज्ञानामध्ये ती फिल्म आता पुन्हा आणावयाची झाली तर ते आता बर्‍यापैकी खर्चाचं काम झालं आहे. जे आता फक्त परदेशातच होऊ शकते. या संदर्भात सुनील काळदाते यांच्याशी ‘चिन्ह’नं वेळोवेळी चर्चा केली आहे. ‘चिन्ह’नं ‘गायतोंडे’ यांच्यावरच्या पुस्तकांची घोषणा केली तेव्हा सुदैवानं काळदाते भारतात होते. फेसबुकवर त्यांच्या फिल्म संदर्भात चर्चा सुरू होताच ‘चिन्ह’नं काळदाते यांच्याशी संपर्क साधला. ‘ती फिल्म पुन्हा नव्या स्वरूपात यावी असं त्यांनाही मनापास्नं वाटतं. पण युरोपातल्या आर्थिक मंदीमुळे त्यांना ते अवघड वाटू लागलं आहे. ज्यांना ती फिल्म पुन्हा पहाता यावी असं मनापासून वाटतं अशा व्यक्ती, संस्था, संघटना जर पुढे आल्या तर त्यांना आपण निश्चितपणानं सहकार्य करू असं ते म्हणाले.’ तर आता चेंडू इकडच्या कोर्टात आहे. पाहूया कोण कोण ही जबाबदारी घेण्यास पुढं येतं ते. ‘

गायतोंडे’ यांच्या निधनानंतर ‘चिन्ह’चं दुसरं पर्व सुरू झालं. २००१च्या पहिल्याच अंकात ‘गायतोंडे’ यांच्यावरची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. तर २००६ साली लिलावात त्यांच्या चित्रा विक्रमी रक्कम आल्यावर त्यांच्यावरचा संपूर्ण अंकच प्रसिद्ध केला होता. शिवाय वेळोवेळी ‘गायतोंडे’ यांच्यावरचे विशेष लेखही प्रसिद्ध केले होते. हे सर्वच साहित्य ‘चिन्ह’नं www.chinha.in या आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं होतं. ‘दिलं होतं’ याचा अर्थ आता ते तेथे नाही. ‘चिन्ह’तर्फे नव्या वर्षाच्या पहिल्या त्रिमाहीत ‘गायतोंडे’ यांच्यावरचं संपूर्ण आर्ट पेपरवर छापलेलं, संपूर्ण रंगीत स्वरूपातलं कॉफी टेबल बुक प्रसिद्ध होत असल्या कारणानं गायतोंडे याच्यावरील संकेतस्थळावरील सर्व लेखन मागे घेण्यात आलं आहे. २००१ सालापासूनच ‘चिन्ह’ ती फिल्म पुन्हा पहाता यावी यासाठी प्रयत्नशील होतं. किंबहूना आहेच. ‘गायतोंडे’ यांच्यावरील या कॉफी टेबल बुक सोबत त्या फिल्मची सीडी देता यावी अशीही एक कल्पना होती. पण दुर्दैवानं ते शक्य झालं नाही. आता होईल असेही वाटत नाही. पण ती फिल्म पुन्हा पहाता यावी यासाठी जर कुणी चित्रकार, कलावंत, कलासमीक्षक, कलाव्यावसायिक, कलासंस्था पुढे येणार असतील तर त्यांना ‘चिन्ह’ निश्चितपणानं सहकार्य करील.




गायतोंडे, पिकासो आणि करवतीनं कराकरा कापलेलं चित्र.

हे पेंटिंग नीट काळजीपूर्वक पहा. प्रख्यात भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं हे जेजे स्कूल ऑफ आर्टच्या संग्रहातलं खूप गाजलेलं पेंटिंग आहे. जेजेच्या संग्रहातलं हे पेंटिंग कला-इतिहासात महत्त्वाचं मानलं जातं. या पेंटिंगच्या बदल्यात एक नाही दोन नाही तब्बल आठ कोटी जेजे स्कूल ऑफ आर्टला द्यावयास मुंबईतील एक परदेशी बँक तयार होती. तेच हे पेंटिंग. पण ‘लोकराज्य’वाल्यांनी ते छापताना चक्क ‘पिकासो’च्या नावावर खपवलं आहे. काय म्हणायचं या कर्माला?
याच चित्रकार गायतोंडे यांचं आणखी एक चित्र जेजे स्कूल ऑफ आर्टच्या संग्रहात आहे. त्या चित्राचा किस्साच मुळी भयानक आहे. 4 x 8 फुटाचं हे चित्र जेजे स्कूल ऑफ आर्टमधल्या स्वच्छतेचा ध्यास लागलेल्या एका माझी अधिष्टाता कम कलासंचालकाला लाकडी फ्रेममध्ये बसवावं असं वाटलं. चित्राला अनुरूप फ्रेम करायची सोडून त्यानं उपलब्ध असलेल्या फ्रेममध्ये ते चित्र बसवायचा घाट घातला आणि चित्र करवतीनं चारी बाजूनं कराकरा कापलं. फ्रेममध्ये बसवताना ते चक्क तडकलं किंवा दुंभगलं तर तिथंच न थांबता हा इसम ते फ्रेममध्ये कोंबून बसवता झाला. ‘गायतोंडेंच्या’ ज्या चित्राला 8 कोटी देऊ केले होते ते चित्र साधारणपणे दीड x दोन फुटाचं असावं तर मग आता आठ फुटापेक्षा जास्त असलेल्या या चित्राची किंमत काय असू शकेल याची कल्पना करता येईल का? ‘चिन्ह’नं हा सारा प्रकार उघडकीला आणला. (पहा ‘कालाबाजार’चा अंक, पान ११३) पण कोणतीच कारवाई झाली नाही. संबंधित सारेच एकमेकांच्या थोबाडाकडे पहात बसले. ज्यानं हे केलं तो हरामखोर यातनं सहीसलामत सुटला. हे असलं दरिद्री महाराष्ट्र शासन. ‘लोकराज्य’वाल्यांनी आपल्या सरकारचे, आपल्या प्रशासनाचे. आपल्याच अधिकार्‍यांचे हे नादान चाळे प्रसिद्ध करायला काय हरकत होती?
‘चिन्ह’कडं त्यांनी ही स्टोरी मागितली असती तर ‘चिन्ह’नं ती नक्कीच विनामूल्य दिली असती. असो. ‘लोकराज्य’मध्ये ती आली नाही म्हणून काय झालं. आम्ही देतोय त्या लिंकवर क्लिक करा आणि स्टोरी वाचा.
http://www.chinha.in/images/archives/2008/Artical%2015.pdf

नेटवर वाचायचा कंटाळा येत असेल तर 200 रुपयांचा अंक 50% सवलतीत म्हणजे 100 रुपयांना + 30 रुपये टपालखर्च असा आता घरपोच पाठवला जातो. '1 m copy Kalabazar' एवढाच sms ‘चिन्ह’च्या 90040 34903 या नंबरवर करा आणि अंक घरपोच मिळवा. टिंग टाँग...... जाहिरात संपली.




‘गायतोंडे’ यांच्यावरचं पहिलं कॉफी-टेबलबुक मे महिन्याच्या पूर्वार्धात प्रसिद्ध होणार आहे. 

‘निवडक चिन्ह’ मालिकेतला दुसर्‍या पर्वातला पहिला खंड आहे तो ‘चित्रकार गायतोंडे’ हा. ‘चिन्ह’च्या २००१ सालच्या अंकातली ‘गायतोंडे’यांच्या विषयीची पंचवीस पानं आणि २००७ सालच्या अंकातली सव्वीस पानं अशा ‘गायतोंडे’ यांच्या विषयीच्या १४० पानातील सर्वश्री प्रफुल्ला डहाणूकर, नरेंद्र डेंगळे, विश्वास यंदे, मनोहर म्हात्रे, शरद पाळंदे, सच्चिदानंद दाभोळकर, शांताराम वालावलीकर, दिलीप रानडे, सुनील काळदाते, नितीन दादरावाला, सुधाकर यादव, कमलेश देवरुखकर आणि ‘गायतोंडे’ यांची भाची अपर्णा तसेच बहिण किशोरी दास यांचे ‘गायतोंडे’ यांच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचा तितक्याच विलक्षण पद्धतीनं परिचय करून देणारे लेख प्रस्तुतच्या या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. या शिवाय आयुष्यभर अत्यंत मोजकं बोलणा्र्‍या ‘गायतोंडे’ यांच्या अतिशय दुर्मिळ अशा पाच मुलाखती आणि त्यांनी स्वत:च लिहिलेला एक लेख. हेही या ग्रंथाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. याखेरीज कलाअभ्यासक पद्माकर कुलकर्णी यांनी केलेलं त्यांच्या जगण्याचं आणि त्यांच्या चित्रांचं विश्लेषण (जे पहिल्यांदाच प्रसिद्ध होतंय) करणारा विशेष लेख. गायतोंडे आणि चित्रकार पळशीकर या दोघा जेजेतल्या सहाध्याय्यामधील मित्रत्वाचं चित्रण करणारा रंजन पाथरे यांचा लेख आणि ‘गायतोंडे’ यांच्या सहवासात आलेल्या आणखी काही कलावंतांनी सांगितलेल्या ‘गायतोंडे’ यांच्या आठवणी हे नवंकोरं लेखन या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

पहाणार्‍याची नजर खिळवून टाकणारी ‘गायतोंडे’ यांची एकाहून एक दुर्मिळ, पेंटिंग्ज आणि रेखाटनांचा समावेश या ग्रंथात आहेच किंबहुना ‘गायतोंडे’ यांच्याविषयीचा आणि चित्रांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात समावेश असलेला हा ‘गायतोंडे’ यांच्यावरचा हा पहिलाच ग्रंथ ठरावा. आणि तो मराठीत प्रसिद्ध होतो आहे याचा ‘चिन्ह’ला रास्त अभिमान आहे.


११ X ९" आकाराची आर्टपेपरवरची २०० पेक्षा जास्त रंगीत पानांचं हार्डबाऊंड बाईंडींग असलेलं अस्सल मराठी कॉफी टेबलबुक, मूल्य रुपये २००० पण २० मार्च आधी नोंदणी केल्यास सवलत 
मूल्य रुपये १४५०. (चित्रकारांना आणि चित्रकलेच्याच नव्हे तर अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत २०००चा खंड रु. १२००ला उपलब्ध) आजच मागणी नोंदवा www.chinha.inसंकेतस्थळावर नाव नोंदवा किंवा ९००४० ३४९०३ या मोबाईलवर 'NKG' असा sms पाठवा

‘गायतोंडे’ कुडाळदेशकरवाडीला का विसरले?

कुडाळदेशकर वाडीतील हीच ती चाळ जिथं ‘गायतोंडे’ लहानाचे मोठे झाले. १९२४ साली नागपुरात जन्मलेले ‘गायतोंडे’ १९७० सालापर्यंत म्हणजे मुंबई सोडून दिल्लीला जाईपर्यंत इथंच रहात होते. याच चाळीत तीन खणांच्या जागेनं त्यांना लहानाचं मोठं होताना पाहिलं. त्यांच्यातला चित्रकार घडताना पाहिलं. चित्रकार होण्याला असलेला वडिलांचा विरोध न जुमानता गायतोंडेंनी स्वत:मधला कलावंत घडवला, स्वत:तला चित्रकार उभा केला तो याच जागेत आणि एके दिवशी स्वत:भोवतीचे सारे पाश तोडून चित्रकलेपुढे कशाकशाचीही पर्वा न करता, कुणालाही न सांगता सवरता इतकंच काय पण आई-बहिणींनासुद्धा न सांगता दिल्लीसारख्या सर्वस्वी अपरिचित मुलखात जाऊन स्थिरावले.


त्यानंतर ते फार क्वचितच मुंबईत आले. आपल्या प्रदर्शनांच्या निमित्तानंच काय ते चार दोन वेळा मुंबईत आले असतील तितकेच पण, आईचं निधन झाल्यावरसुद्धा मुंबईकडे ते फिरकले नाहीत. 



काय घडलं असेल नेमकं? ते मुंबईकडे पुन्हा का फिरकले नसतील? जिथं आपलं बालपण गेलं, जिथं आपली जडण घडण झाली त्या मुंबईकडे, त्या गिरगावकडे, त्या कुडाळदेशकरवाडीतल्या आपल्या घराकडे त्यांना एकदासुद्धा का फिरकावसं वाटलं नसेल?

‘चिन्ह’च्या वतीनं मुळचे अस्सल गिरगांवकर असलेल्या, विलक्षण संवेदनशिलता लाभलेल्या कमलेश देवरुखकर यांनी घेतलेला, चटका लावून जाणारा, क्वचित डोळ्यांच्या कडासुद्धा ओलावून टाकणारा, अस्वस्थ करणारा भन्नाट शोध! वाचा ‘गायतोंडे’ या ‘चिन्ह’च्या आगामी ग्रंथात. 



गायतोंडे यांच्या शोधात आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे



गायतोंडे यांच्यासोबत दिसताहेत ते हे आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे. मुळचे पुण्याचे पण नोकरीनिमित्तानं त्यांना १९७४ ते १९८३ दिल्लीत वास्तव्य करावं लागलं. त्यांच्या पत्नी म्हणजे चित्रकर्ती विद्या डेंगळे, ज्या व्हॉयोलीन वादक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील म्हणजे चित्रकार बी. के. देसाई. जे पळशीकर, लक्ष्मण पै, गायतोंडेंचे सहाध्यायी होते. शिवाय ते गायतोंडेंच्याच कुडाळदेशकरवाडीत रहायचे. दिल्लीत एकदा धूमीमल आर्ट गॅलरीत गायतोंडे आणि डेंगळे दाम्पत्याची भेट झाली आणि गायतोंडे यांनी नरेंद्र डेंगळे यांना थेट जंगपुर्‍यातील त्यांच्या बरसातीतल्या स्टुडिओत येण्याचं आमंत्रणच दिलं. त्यानंतर डेंगळे दिल्ली सोडेपर्यंत गायतोंडे यांच्या स्टुडिओत जातच राहिले. या ९-१० वर्षातील गायतोंडे यांच्या सोबतच्या मैत्रीवर आधारित एक लेख त्यांनी १९८८ साली ग्रंथालीच्या ‘रुची’ या अंकात लिहिला.

‘गायतोंडे’ यांच्याविषयीची ज्याला ‘फर्स्ट हँड’ म्हणता येईल अशी माहिती या लेखात पहिल्यांदाच प्रकाशित झाली. लेखक, पत्रकार, चर्चा वगैरे करणार्‍यांपासून फटकून रहाणार्‍या गायतोंडे यांनी कधी कुणाला फारसं जवळ येऊच दिलं नाही. प्रीतिश नंदी वगैरेंनी घेतलेल्या मुलाखती या फार नंतरच्या. डेंगळे यांच्या या लेखाच्या किती झेरॉक्स निघाल्या आणि झेरॉक्सवरून झेरॉक्स कितीजणांनी काढल्या याची गणतीच नाही. गायतोंडेंच्या सर्वच चाहत्यांनी यासाठी ग्रंथालीचे सर्वेसर्वा दिनकर गांगल यांचे जाहीर आभार मानायला हवेत.

एखाद्या चित्रकारावर मराठीत प्रसिद्ध झालेल्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लेखांमधील तो आजवरचा सर्वोत्कृष्ट लेख ठरावा. हाच लेख नंतर ‘चिन्ह’नं २००७ सालच्या अंकात पुर्नप्रकाशित केला. त्याचा उत्तरार्ध लिहावा अशी ‘चिन्ह’नं डेंगळे यांना विनंती केली. त्यांनीही ती आनंदानं मान्य केली. हा लेख आता ‘गायतोंडे’ ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. ‘गायतोंडे’ यांच्याविषयीचं सर्वच कुतूहल काही अंशी पूर्ण करतो. गायतोंडे यांच्या चित्रनिर्मितीविषयी आणि प्रक्रियेविषयी विशेष माहिती पुरवतो जी आजवर कुणीच देऊ शकलं नव्हतं.
 



गायतोंडे यांनी स्वत:वरची फिल्म पाहिली होती की नव्हती?

गायतोंडे यांचं प्रकाशचित्र टिपतायत ते सुनील काळदाते. पॅरिसमध्ये स्थायिक झालेले काळदाते नुकतेच भारतात येऊन गेले. याच काळदातेंचं प्रदीर्घ आत्मकथन ‘चिन्ह’नं २००६च्या अंकात प्रसिद्ध केलं होतं. १९९५ साली याच काळदाते यांनी ‘गायतोंडे’ यांच्यावर एक छोटी फिल्म बनवली होती. सुमारे २६ मिनिटाची. ती सार्‍या जगभर गाजली होती.


‘माझ्यावर फिल्म बनवणार आहेस बनव पण माझ्या रोजच्या कार्यक्रमात व्यत्यय आणायचा नाहीस, तू म्हणशील ब्रश हातात घे कॅनव्हाससमोर उभा रहा, मी रहाणार नाही, तू म्हणशील असं कर तसं कर मी करणार नाही. तू म्हणशील ते मी काहीच करणार नाही. बनवायची असेल तर बनव फिल्म.’ सुनील पण जिद्दी. त्यानं आव्हान स्वीकारलं. आधीचा सारा आराखडा रद्द केला आणि संपूर्ण नव्यानं विचार केला. पॅरिसहून आपल्या दोघा तंत्रज्ञ मित्रांना बोलावलं आणि दिल्लीत आठ-दहा दिवसात फिल्मचं शूटिंग पूर्ण केलं. ‘गायतोंडे’ना दिलेल्या शब्दाला सुनील जागला. नाही म्हणायला फिल्मच्या एका शेवटच्या तुकड्यासाठी त्यानं ‘गायतोंडे’ यांना विनंती केली की ‘शुबेर’ची रेकॉर्ड लावाल का? गायतोंडेंनीही सुनील यांच्या शब्दाला मान दिला आणि रेकॉर्ड लावतानाचं दृश्य शूट करून दिलं.

२६ मिनिटाच्या त्या फिल्ममध्ये प्रताप शर्मांचं निवेदन, तेही फक्त तीन-चार मिनिटाचं, अख्ख्या फिल्ममध्ये तेवढेच फक्त शब्द.(या प्रताप शर्मांचं महिनाभरापूर्वीच निधन झालं.) बाकी फक्त पडदाभर गायतोंडेच दिसत रहातात. बसलेले गायतोंडे, विचार करणारे गायतोंडे, अपघातानं विकलांग झालेले गायतोंडे, पाय ओढत चाललेले गायतोंडे, येराझार्‍या घालणारे गायतोंडे, कॅनव्हाससमोर निस्तब्ध गायतोंडे बस्स!

फिल्म संपते. पहाणारे सुन्न झालेले असतात, हादरून गेलेले असतात. काय करायचं ते न कळून भारावून उभे रहातात. टाळ्या वाजू लागतात. थिएटरभर टाळ्यांची लाट पसरत जाते. एकदा, दोनदा, पुन: पुन्हा. सार्‍या जगभरातल्या मोठ्या मोठ्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये फिल्मला स्टॅन्डींग ओव्हेशन मिळालं.

‘‘ती फिल्म तुम्ही पाहिली का?’ सुनीलनं तुम्हाला सार्‍या जगभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे!’’ गायतोंडेंना त्यांच्या मित्रानं एकदा सांगितलं, तर गायतोंडे म्हणाले, ‘नाही ! पण आय नो स्टॅन्डींग ओव्हेशन’. गायतोंडे यांची प्रतिक्रिया ही एवढीच होती.

त्याच फिल्मच्या शूटींगच्या आणि गायतोंडे यांच्या आठवणी सांगतायत सुनील काळदाते ‘गायतोंडे’ या 

ग्रथांत.



आणि ‘गायतोंडे’ यांनी चित्राचा प्रिंट भेट दिला !



हे नितीन दादरावाला. पूर्वी कविताही करायचे. कवितेच्या क्षेत्रात त्यांचं चांगलं नावही झालं होतं, पण चित्रकलेनं भूरळ घातली आणि ट्रॅक बदलला. चित्रकार झाले. बँकेतली चांगली नोकरी सोडून मालाडमधल्या आपल्या स्टुडियोत बसून चित्रसाधना करू लागले. मुंबईच्या हसिएंडा गॅलरीत त्यांच्या चित्रांचं कालपासून प्रदर्शन भरलं आहे. येत्या दोन-तीन दिवसात जहांगीरकडे फिरकलात तर पहायला विसरू नका. उद्या शनिवारी तर दादरावाला पूर्ण वेळ गॅलरीत असणार आहेत. ज्यांना त्यांना भेटायचं आहे तेथे त्यांना भेटता येईल.

याच नितीन दादरावाला यांनी ‘गायतोंडे’ यांच्यावर ‘चिन्ह’साठी दोन लेख लिहिले होते. एक २००१ सालच्या अंकात तर दुसरा २००६च्या. दोन्ही खूपच गाजले. ‘गायतोंडे’ आयुष्यभर अनोळखी लोकांशी फटकून वागले. चित्रकारांनासुद्धा त्यांनी फार स्वत:जवळ येऊन दिलं नाही. दूरच ठेवलं. पण ‘गायतोंडे’ यांच्यावरच्या फिल्मच्या वेळी सुनील काळदाते यांना सहाय्य करण्याच्या निमित्तानं दादरावाला दिल्लीला गेले आणि मग दहा-पंधरा दिवस ‘गायतोंडे’ यांच्याकडे जातच राहिले. त्या बैठकांमध्ये चित्रकला, संगीत, साहित्य, मराठी संस्कृती या संबंधी गायतोंडे यांच्याशी तुटक संभाषणातून ज्या ज्या चर्चा झाल्या त्या सार्‍या दादरावालांनी आपल्या पहिल्या लेखात टिपल्या. ‘गायतोंडे’ यांचं निधन झाल्यावर जो अंक ‘चिन्ह’नं काढला त्यात तो प्रकाशित झाला आणि अतिशय गाजला.

दादरावाला, काळदाते यांच्याशी झालेला संवाद ‘गायतोंडेंना’ बहुदा आवडला असावा. कारण तसं नसतं तर शेवटच्या दिवशी निरोप घेताना दादरावाला अणि काळदातेंना खालून परत वर बोलावून ‘गायतोंडे’ यांनी सही करून स्वत:च्या चित्राचा प्रिंट भेट म्हणून दिला नसता. नितीन दादरावालांनी ‘गायतोंडे’ विषयीच्या सार्‍याच आठवणी त्या लेखामध्ये छान मांडल्यात. दादरावालांचे हे दोन्ही लेख आता ‘गायतोंडे’ ग्रंथात समाविष्ट केले आहेत.





गायतोंडे आणि म्हात्रे

हे चित्रकार मनोहर म्हात्रे. हे भविष्य वगैरे जाणतात. (मनात असलं तर सांगतातही) कला क्षेत्रातले भलेभले यांना बिचकून असतात, कारण हे कधी काय सांगतील याचा नेम नाही. यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर ‘चिन्ह’च्या २००७च्या अंकातला कमलेश देवरुखकर यांचा लेख वाचा. हा अंक ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. हे सारं आजच सांगायचं कारण म्हणजे हे म्हात्रे ‘चित्रकार गायतोंडे’ यांचे विद्यार्थी. गायतोंडे जेजेत शिकवत असताना म्हात्रेंना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. गायतोंडे आणि म्हात्रे यांची छान मैत्री जमली. त्याच सार्‍या आठवणी म्हात्रेनी ‘गायतोंडे’ अंकासाठी सांगितल्या. ‘गायतोंडे’ यांच्या ग्रंथात त्या समविष्ट करण्यात आल्या आहेत.

म्हात्रेंचा वरील लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2007/Artical%208.pdf





यंदे आणि गायतोंडे

हे आहेत विश्वास यंदे. जेजेमध्ये क्लार्क म्हणून लागलेले यंदे सर जेजेच्या फाईन आर्ट विभागाचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. जेजेच्या लायब्ररीचं काम संभाळत असताना यंदेंचा परिचय तिथं शिकत असलेल्या गायतोंडे यांच्याशी झाला. वाचनाचं अतोनात वेड असलेल्या गायतोंडे आणि यंदेचं मैत्र जुळायला वेळ लागला नाही. पुस्तकं, त्यांचं वाचन आणि त्यावरच्या चर्चा यातून यंदे आणि गायतोंडे यांच्यात खूपच देवाण-घेवाण झाली. ‘चिन्ह’च्या गायतोंडे विशेषांकाच्या वेळी गायतोंडे यांच्या विषयीच्या सार्‍याच आठवणींना यंदेसरांनी उजाळा दिला. आणि कमलेश देवरुखकरांच्या शब्दांकनातून साकारला तो ‘जब गायतोंडे तख्तपर बैठे !’ हा लेख. जो पुन: पुन्हा वाचावासा वाटतो. आणि प्रत्येक वेळी वाचणार्‍याला तो नवं काही तरी देऊन जातो. हा लेख आता ‘गायतोंडे’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.






गायतोंडे आणि दाभोळकर

हे सच्चिदानंद दाभोळकर. जे वॉल्टर थॉम्सनमध्ये १० वर्ष आर्ट डायरेक्टरपद. नंतरची ११ वर्ष टेल्कोमध्ये पब्लिसिटी हेड आणि त्यानंतर १३ वर्ष एअर इंडियाचं डेप्युटी डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी हे मानाचं पद भूषवणारे सच्चिदानंद दाभोळकर हे चित्रकार गायतोंडे यांचे विद्यार्थी. गायतोंडे यांच्या इन्यागिन्या अशा जवळच्या स्नेह्यामधले ते एक मानले जातात. ‘गायतोंडे यांच्या शोधात’ अंकासाठी जेव्हा ‘चिन्ह’नं त्यांना गाठलं तेव्हा कुठलेही आढेवेढे न घेता ते बोलायला तयार झाले. खूप छान आठवणी आणि निरिक्षणं श्री. दाभोळकर यांनी नोंदवली. विशेषत: लेखाच्या शेवटी त्यांनी सांगितलेली आठवण कुणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करील. तो लेख मुळातून वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%206th.pdf
श्री. दाभोळकरांचा हा लेख ‘गायतोंडे’ या ग्रंथातही घेण्यात आला आहे.


‘गायतोंडे आणि पाळंदे’

गायतोंडे यांच्या सोबत दिसताहेत ते शरद पाळंदे. हेसुद्धा जेजेचेच विद्यार्थी. गायतोंडे जेजेत शिकत असताना शरद पाळंदे त्यांचे विद्यार्थी होते. एका अर्थानं ते गायतोंडे यांचे शिष्य, मग मित्र आणि गायतोंडे यांच्या नात्याच्याच एका मुलीशी विवाह केल्यानं नातेवाईक म्हणूनही त्यांची गायतोंडेंशी जवळीक होती. २००६ सालच्या ‘गायतोंडे’ अंकासाठी आपल्या आठवणी सांगताना त्यांनी जेजे मधले ते दिवस शब्दातून उभे केले. गायतोंडे यांची त्यांना भावलेली सारी गुणवैशिष्ट्यं त्यांनी शब्दातून उभी करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला आहे. ‘गायतोंडे’ यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात ते दिल्लीला जाऊन भेटले होते. त्याविषयी ते म्हणतात, ‘अ‍ॅक्सिडेंटच्या काळात जरी त्यांचं काम बंद होतं, तरी त्यांचा मेंदू चालू होता. जेव्हा गायतोंडे यांचा हात परत चालू लागला तेव्हा त्या आठ वर्षातली मेंदूची तपश्चर्या पुनश्च कॅनव्हासवर उतरली’.
हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%208th.pdf




‘गायतोंडे आणि शांतू अमोणकर’

गोव्यातील चित्रकार शांतू आमोणकर हे ‘चित्रकार गायतोंडे यांचे बालमित्र. गायतोंडे यांच्या मुंबईतल्या सुरुवातीच्या दिवसाचे साक्षीदार. ‘गायतोंडे’ नूतन कलामध्ये नापास झाले होते. जेजेला प्रवेश घेण्यापूर्वी पैसे जमविण्यासाठी ‘गायतोंडे’ एका दुकानात वर्षभर नोकरी करीत होते. वगैरे माहिती ‘चिन्ह’ला याच शांतू आमोणकर यांनी पुरवली. ‘गायतोंडे’ ‘आरएसएस’वाले होते आणि नेमानं शाखेत जात असत. ही माहितीही त्यांचीच. शेवटपर्यंत आमोणकर ‘गायतोंडे’ यांच्या संपर्कात होते. गायतोंडे आपल्या बालमित्रासोबत अनेक गोष्टी शेअर करीत होते. उदाहरणार्थ ‘गायतोंडे’ यांना पद्मश्री कशी मिळाली तो किस्सा. जो आमोणकरांना गायतोंडे यांनीच सांगितला.
हे सारं मुळातून वाचायचं असेल तर पुढिय लिंकवर क्लिक करा.

http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%2012th.pdf





‘नात्यात न रमणारे गायतोंडे’

शांताराम वालावलीकर हे ‘गायतोंडे’ यांच्या नात्यातले. म्हणजे गायतोंडे त्यांचे आतेभाऊ लागत. त्यामुळे वालावलीकरांना ‘गायतोंडे’ यांचं घडणं हे अगदी जवळून पहावयाची संधी मिळाली. या वालावलीकरांच्याच ‘कथना’मुळे ‘चिन्ह’ला तरुणपणीच्या ‘गायतोंडे’ यांची जडणघडण कळू शकली. ‘गायतोंडे’ यांनी नात्यांचे सारे पाश किती कठोरपणाने तोडून टाकले होते हे वालावलीकरांनी सांगितलेल्या अनेक आठवणीतून दिसून येतं. अनेक वर्षांनी गोव्यात गेल्यावर गोव्यातल्या नातलगांना भेटणं गायतोंडे यांनी कसं टाळलं होतं ते मुळातून वाचायचं असेल तर इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%2010th.pdf





गायतोंडे आणि त्यांची सख्खी बहिण !
‘गायतोंडेच्या शोधात’ हा अंक जेव्हा ‘चिन्ह’नं २००६ साली प्रसिद्ध केला तेव्हा त्यातला सर्वात गाजलेला लेख होता तो त्यांच्या बहिणीचा. ‘किशोरी’ हे त्यांचं माहेरचं नाव. ‘किशोरी गायतोंडे’. ‘गायतोंडे’ यांची ती धाकटी बहिण. ‘गायतोंडे दिल्लीला निघून गेले तेव्हा ‘किशोरी’ खूप लहान होती. पण वडिलांच्या निधनानंतर तिनंच वासुदेव गायतोंडे यांच्या पश्चात आईचा संभाळ केला. घर चालवलं. पण गायतोंडे मात्र आपल्या आवडत्या धाकट्या बहिणीला नंतर सतत टाळतच राहिले. इतकंच काय पण आई गेल्यावरसुद्धा ते मुंबईत आले नाहीत. जणू आपल्या भोवतालचे सारेच्या सारे पाश त्यांनी तोडले होते. त्या गायतोंडे यांच्या या सख्ख्या बहिणीचं हे आत्मकथन तेव्हा खूपच गाजलं. ‘असं होऊ शकतं!’, ‘असं होऊ शकेल!’ अशा नानाप्रकारच्या प्रतिक्रिया तो लेख वाचल्यावर अनेकांच्या मनात उमटल्या होत्या. त्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही देत आहोत. ‘होय ! जे घडलं ते असंच होतं. हे खरंच आहे. अगदी खरं’. किशोरी गायतोंडे-दास यांचा हा लेख वाचायचा असेल तर इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%203rd.pdf




‘गायतोंडे’ आणि डहाणूकर

‘गायतोंडे’ जेव्हा वर्ष-एखादं वर्ष जेजेस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करीत होते तेव्हा त्यांची मैत्री शरद पाळंदे, मनोहर म्हात्रे, श्रीकांत वणकुद्रे आणि सच्चिदानंद दाभोळकर या ग्रुपशी झाली. त्याच ग्रुपमधल्या एक म्हणजे प्रफुल्ला डहाणुकर. तेव्हाच्या प्रफुल्ला जोशी. या सर्वांचेच ‘गायतोंडे’ यांच्याशी छान मैत्र जुळले होते. ‘चिन्ह’नं या सर्वांना बोलतं करायचं ठरवलं तेव्हा या सर्वांनीच छान प्रतिसाद दिला. प्रफुल्ला डहाणूकरांनी तर ‘गायतोंडे’ यांच्या असंख्य आठवणी जागवल्या. ‘गायतोंडे’ यांच्या चित्रात रोलर कसा अवतरला याचा तो किस्सा तर खासच आहे. आणखी अनेक खास गोष्टी या लेखात आहेत. जरूर वाचा. http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%209th.pdf इथं क्लिक केल्यास B/W लेख लगेच वाचता येईल. आणखी थोडं थांबाल तर हे सारं लिखाण ‘गायतोंडे’ यांच्या रंगीत चित्रांसह त्याच्या वरच्या विशेष ग्रंथात वाचता येईल. त्या ग्रंथाची माहिती मिळवायची असेल तर इथं क्लिक करा.http://www.chinha.in/promo/Nivdak_grp.pdf




गायतोंडे आणि कमलेश देवरुखकर

हे कमलेश देवरुखकर. मूळचे कवी पण कॉपीरायटर, पत्रकार, लेखक अशा विविध भूमिकांमध्ये ते ओळखले जातात. ‘चिन्ह’च्या अंकाला ते संपादन सहाय्य करीत असत. ‘चित्रकार गायतोंडे’ यांच्यावर अंक करायचं जेव्हा निश्चित झालं तेव्हा ‘गायतोंडे’ यांचं लोकविलक्षण जगणं ऐकून कमलेश थरारला. त्यानं हा अंक करायचाच म्हणून मनावर घेतलं. पण गायतोंडे यांच्या जवळच्या व्यक्तींना गाठायचे एकेक प्रयत्न जसजसे फसू लागले तस तसा अंक खूप पुढे पुढे ढकलला गेला. पण कमलेशच्या चिकाटीमुळेच ‘गायतोंडे’चा अंक तयार झाला ही वस्तूस्थिती आहे. ‘गायतोंडे’ यांच्या लोकविलक्षण आयुष्यासोबत ते मूळचे गिरगांवकर होते. (आणि कमलेशही पक्का गिरगावकर) हा अंध त्याला बहुदा अधिक भावला असावा. पण कमलेशनंचिकाटी दाखवली नसती तर ‘गायतोंडे’ यांच्यावरचा अंक निघाला नसता हेही तितकंच खरं. ‘गायतोंडे’ यांचा शोध कसा कसा घेतला गेला या विषयी कमलेशनं एक प्रदीर्घ लेख लिहिलाय. तो वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/images/archives/2006/Artical%2011th.pdf
किंवा ते रंगीत स्वरूपात वाचायचा असेल तर ‘गायतोंडे’ खंड बुक करा.



‘पळशीकर आणि गायतोंडे’

हे रंजन पाथरे. कोणे एके काळी साप्ताहिक लोकप्रभामध्ये विलक्षण जाणकारीने चित्रकलाविषयक सदर चालवणारे रंजन पाथरे हे मूळचे चित्रकार आणि तेही अर्थातच जेजेचेच. ठाण्यात रहात असल्याने ते चित्रकार पळशीकरांच्या संपर्कात आले. पाथरे जेजेमध्ये शिकत होते तर पळशीकर जेजेचे डीन होते पण दोघांमधलं ३०-३५ वर्षाचं स्नेहबंध निर्माण होण्यास आडकाठी करणारं उरलं नाही. पळशीकर पाथरे यांच्याशी अनेक विषयावर बोलत, भरभरून बोलत. त्यातले विषय कधी चित्राचे असत तर तंत्र मंत्राचेसुद्धा असत. कधी पुस्तकाविषयी ते बोलत तर कधी कलेच्या शास्त्राविषयी.

आपल्या बरोबरीच्या अनेक चित्रकारांविषयी पळशीकर पाथरे यांच्याकडे मनमोकळं बोलले असणार असा आमचा अंदाज होता आणि तो खराच ठरला. जेजेमधल्या आपल्या सहाध्यायाविषयी म्हणजे वासुदेव गायतोंडे यांच्याविषयी पळशीकर काय बोलले असतील? याविषयी ‘चिन्ह’ला कुतुहल होतं. पाथरे यांच्याकडे त्याविषयी विचारणा केली असता त्यांनीही खूप काही सांगता येईल असं म्हटलं आणि मग ‘चिन्ह’नं पाथरेंना ते सारं काही लिहून देण्याची विनंती केली. पाथरे यांनीही ती त्वरीत मान्य केली. हा लेख आता ‘गायतोंडे’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात येणार आहे.



‘गायतोंडे आणि कुलकर्णी’

हे पद्माकर कुलकर्णी. चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्यावर जे भलथोरलं पुस्तक दोन-तीन वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं होतं त्याचे हे लेखक. किंवा झालंच तर ‘चिन्ह’च्या कालाबाजार अंकात चित्रकला शिक्षणसंदर्भात जो भलामोठा अभ्यासत्मक लेख प्रसिद्ध झाला होता तो यांचाच. सामाजिक सांस्कृतिक संदर्भासकट कला, कलावंत आणि कलानिर्मिती यांचा विचार हे कुलकर्णी यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

आपल्या या वैशिष्ट्यांसह ते चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांवर, चित्रनिर्मितीवर आणि त्यांच्या लोकविलक्षण जगण्यावर लिहू पहातायत. कदाचित अशा प्रकारचं हे गायतोंडे यांच्या सारख्या अमूर्त चित्रकारावर प्रसिद्ध होणारं पहिलंच लेखन ठरावं. या निमित्तानं ‘गायतोंडे’ यांची महत्त्वाची चित्रं एकत्रित स्वरूपात पहाण्याची कलारसिकांना प्रथमच संधी मिळणार आहे.

११ X ९" आकाराची आर्टपेपरवरची २०० पेक्षा जास्त रंगीत पानांचं हार्डबाऊंड बाईंडींग असलेलं अस्सल मराठी कॉफी टेबलबुक, मूल्य रुपये २००० पण २० मार्च आधी नोंदणी केल्यास सवलत मूल्य रुपये १४५०. (चित्रकारांना आणि चित्रकलेच्याच नव्हे तर अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत २०००चा खंड रु. १२००ला उपलब्ध) आजच मागणी नोंदवा www.chinha.inसंकेतस्थळावर नाव नोंदवा किंवा ९००४० ३४९०३ या मोबाईलवर '1 NKG' असा sms पाठवा 

‘गायतोंडे’ ग्रंथाविषयी माहिती करून घ्यायची असेल तर कृपया इथं क्लिक करा.
http://www.chinha.in/promo/Nivdak_grp.pdf