Friday, October 31, 2014


दि. २४ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कच्या ग्युगेनहाईम म्युझियममध्ये चित्रकार गायतोंडे यांचं रिट्रोस्पेक्टीव्ह शो सुरु होतोय. या शोचा प्रारंभ पेरिसनिवासी सुनील काळदाते यांच्या गायतोंडे यांच्यावरील फिल्मनं होणार आहे. भारतीय चित्रकलेच्या दृष्टीने ही खूप मोठी घटना आहे. या संदर्भातल्या साऱ्याच लिंक आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी यासाठी कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.

https://guggenheim.fashiongps.com/events/read_mail.php?i=QEALAKA

http://www.chinha.co.in/marathi/archive2006.html

http://www.chinha.co.in/promo/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

http://www.chinha.co.in/marathi/gallery_2014.html

http://www.chinha.co.in/english/gallery_2014.html

https://www.facebook.com/pages/Gaitondeगायतोंडे/164757170298118

http://www.nytimes.com/2014/10/19/arts/design/v-s-gaitondes-art-gets-a-guggenheim-retrospective.html?smid=fb-share&_r=0

http://www.livemint.com/Leisure/DE8VxU7HMfWxghVyq9NRIN/In-focus-the-Gaitonde-narrative.html

http://www.livemint.com/Leisure/F3Vx7MJdOkqWrOHL5OKXnK/Gaitonde--Souza-two-friends-from-Goa.html

http://wsimag.com/art/11303-v-s-gaitonde-painting-as-process-painting-as-life


'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीच्या कथेची कथा…


 ''गायतोंडे'' ग्रंथ हा एका खास डिझाईन केलेल्या १४ बाय ११ इंच आकाराच्या कोरोगेटेड बॉक्स मधून वाचकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे .या बॉक्समध्ये २१४ पानांचा ' गायतोंडे ' ग्रंथ असणार आहे आणि सोबत ग्रंथाच्याच आकाराची २८ पानांची पुस्तिका दिली जाणार आहे. जिच्यातला लेख मी या ग्रंथाचं संपादकीय म्हणून लिहिला होता. आधी ते पानांमध्ये संपादकीय आटोपायचे असे निश्चित केले होते. पण लिहायला लागलो आणि लिहीतच गेलो. पाच - दहा - पंधरा हजार असे शब्दसंख्येच्या वेगवेगळ्या टप्प्यावर थांबत गेलो, तेव्हा खरं तर लक्षात येत होतं की हे आता मारुतीच्या शेपटासारखं वाढत चाललं आहे. पण हे सारं कधीना कधी सांगावं तर लागणारच होतं, मग विचार केला की 'ते आताच का नको ?' आणि मग जो थांबलो तो १९ -२० हजार शब्द संख्येवरच.

लेख पूर्ण झाल्यावर ग्रंथात घेतला, पण मनात शंकेची पाल चुकचुकली की हे काही बरोबर नाही. हा लेख ग्रंथाचा जो एकूण बाज तयार झाला आहे त्यात काहीसा खटकतोय. शब्दांचा अतिशय मोजका वापर करणारे गायतोंडे एकीकडे आणि दुसरीकडे शब्दातूनच सारं काही भडाभडा सांगणारा त्यांच्यावरच्या ग्रंथाचा संपादक मी, हे समीकरण काही बरे जुळून येईना. काहीतरी खटकू लागलं पण आधी ठरल्याप्रमाणे तो ग्रंथात घेतला तेव्हा त्याचा विस्तार एवढा मोठा होता की त्यानं ग्रंथाची तब्बल २४ पानं व्यापली. लेख पुन्हा पुन्हा अनेक वेळा वाचला. काही कमी करता येईल का हे पाहिलं. पण घडलं उलटंच, पुन्हा पुन्हा वाचतांना त्यात असंख्य जागा दिसू लागल्या आणि तो वाढतच गेला.

ग्रंथात संपादकीय म्हणून तो लेख ग्रंथाच्या प्रारंभीच लावला गेला पण त्यामुळे झाल असं की, ग्रंथाचे चक्क दोन भाग पडू लागले. कारण या संपादकीयात एकही चित्र किंवा प्रकाशचित्र वापरलं नव्हतं. सर्वच पानं मजकुराची त्यामुळं प्रथम दर्शनीच ग्रंथ अनाकर्षक वाटला जाण्याची शक्यता होती म्हणून मग संपादकीय हलवून ग्रंथाच्या शेवटी घेतले. पण त्यामुळे ग्रंथाचे दोन भाग पडायचे ते पडतच होते. आणि मुख्य म्हणजे लेखाच्या रोख ठोक भाषेमुळे या ग्रंथाच्या साऱ्याच संयमित बाजाला धक्का बसू शकेल की काय अशी भीती वाटत होती. काय करावे ते सुचेना. एक पर्याय डोळ्यासमोर आला तो म्हणजे हा प्रदीर्घ लेख ग्रंथातून वेगळा करायचा आणि वेगळ्या पुस्तिकेद्वारा ग्रंथासोबतच द्यायचा.

पण इतका मोठा निर्णय घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न उभा राहीला. विचार केला की, यावर चित्रकार प्रभाकर कोलते यांचा सल्ला घ्यायचा. सरांना लेखाचे प्रिंट आऊट दिले, पण जे काही मनात घोळत होते ते काही सांगितले नाही. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात त्याच मला पहायच्या होत्या. सरांनी रात्रभर जागून तो लेख वाचला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला म्हणाले, 'लेख अप्रतिम आहे, पण या ग्रंथात मात्र तो नको, हवं असल्यास वेगळा देऊया.' हे ऐकलं आणि हा लेख वेगळ्या पुस्तिकेद्वारे द्यायचा निर्णय नक्की झाला. एखाद्या ग्रंथाच्या संपादकानं स्वतःचाचं लेख ग्रंथातून काढायचा निर्णय घेणं हे बहुधा मराठी ग्रंथांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे. त्यामुळे या पोस्टच्या प्रारंभी जे लिहिले आहे त्या स्वरुपात हा लेख वाचकांच्या भेटीला येणार आहे.

गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीचा साराच अनुभव हा असा उफराटा होता, पण काम करतांना मोठा मझा आला. आता या साऱ्यामुळेच प्रकाशनाला मात्र अत्यंत अत्यंत अक्षम्य विलंब होतो यात शंकाचं नाही. पण मी तरी काय करू ? माझाही नाईलाज असतो. करायचं ते सर्वोत्कृष्टचं असं आधीच ठरवलं असल्यामुळे मला यातले सारेचं ताणे बाणे सोसावे लागतात. पण अशी जी धाडसं मी करू शकतो ते 'चिन्ह'च्या जगभरात पसरलेल्या वाचकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच. आता एवढचं सांगतो हा ग्रंथ पाहिल्यावर तुम्ही देखील नक्की म्हणाल असा ग्रंथ मराठीत झाला नाही.