Saturday, June 28, 2014

ही फ़क्त सुरुवात आहे…

गायतोंडेग्रंथासाठीचिन्हला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत पंडोल आर्ट गेलरीचे संचालक दादीबा पंडोल म्हणतात…” गायतोंडेंचा गॅलरिस्ट या नात्याने मला वेगळं असं काही वाटत नाही. माझ्या त्यांच्याबद्दलच्या मतातही फ़रक नाही. आणि असं आहे काळ स्वत:चा असा एक वेळ घेतो काही नियम एस्टॅब्लिश करण्यात. त्यांची स्वत:ची अशी एक नैसर्गिक गती असते तेव्हाच ते अस्तित्त्वात येतात. ते नियम असे की जे चांगलं आहे ते फ़ार काळ नाकारलं जाऊ शकत नाही. मात्र ते कधी आणि कसं मान्य होणार हे काळ ठरवतो. ज्याच्या त्याच्या नशिबात लिहून ठेवलेलं श्रेय त्याला मिळाल्यावाचून कधीच रहात नाही. मात्र ते ज्यावेळी आणि जितकं मिळायचं असतं तितकंच आणि तेव्हाच मिळतं. गडबड घोटाळे करुन तुम्ही गोष्टी वेळेच्या आधी घडवून आणू शकत नाही. एखादा सामान्य चित्रकार आहे आणि त्याच्या चित्राला असामान्य किंमत मिळाली हे एखाद्यावेळी घडून येतंही. पण एकदाच. पुन्हा तसं शक्य होत नाही. गायतोंडेंच्या बाबतीत तर मुळातच त्यांची कला श्रेष्ठ दर्जाची. मला तर वाटतं ही  फ़क्त सुरुवात आहे”.३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ फक्त १६५० सवलत शुल्कात घ्यायची ही आता अखेरची  संधी. ९००४० ३४९०३ या चिन्हच्या मोबाईल नंबरवर तुमचा नाव, पत्ता, ई-मेल पाठवून  आपली मागणी नोंदवा.

‘गायतोंडे’ यांचं श्रेष्ठत्व हुसेन यांनाही मान्य होतं…


गायतोंडेग्रंथासाठीचिन्हला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत पंडोल आर्ट गेलरीचे संचालक दादीबा पंडोल म्हणतात… “गेल्या पिढीतले ज्येष्ठ चित्रकार बहुतेक आता आपल्याला सोडून गेले आहेत. पण या सगळ्यांवरुन एक नजर फ़िरवली आणि मागे वळून पाहीलं तर मला गायतोंडे अजूनही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. अजूनही ते ग्रेटेस्ट आर्टिस्टच आहेत. इतके की मला त्यांच्यानंतरचं दुसरं नावही पटकन सांगता येत नाही. मी त्यांना आजही सर्वश्रेष्ठ चित्रकारच मानतो.

आता खरं असं आहे की हुसेनच्या बाबतीत मी खूप पार्शल आहे. ते मी कबुलच करतो. त्याची आर्ट मला खूप आवडते. पण मी हुसेनलाही हे सांगीतलं होतं की I consider Gaitonde as India’s greatest artist. त्यावर तोही म्हणाला की या तुझ्या विधानात नाकारण्यासारखे काहीच नाही, त्यावर चर्चाही होऊ शकत नाही.

हुसेनच्या बाबतीत एक गोष्ट अतिशय मानण्यासारखी होती की तुम्ही त्याच्याजवळ इतर चित्रकारांच्या गुणवत्तेचं, श्रेष्ठत्वाचं मनमोकळं कौतुक करु शकत होता. हुसेन आपल्यापेक्षा त्यांच्यामधे काय जास्त चांगलं आहे हे स्वत:हून कबूल करायचा. बौद्धीक पातळीवर सूझा, तय्यब, गायतोंडे आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत हे तो मान्य करायचा. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो असं सांगायचा. त्याने हे ऑन रेकॉर्ड म्हटलं आहे की सूझाने त्याला प्रोग्रेसिव्हमधे घेतलं नसतं तर तो आज कुठेच नसता. सूझाने त्याच्यातलं वेगळेपण ओळखलं होतं”.


३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ फक्त १६५० सवलत शुल्कात घ्यायची ही आता अखेरची संधी. ९००४० ३४९०३ या चिन्हच्या मोबाईल नंबरवर तुमचा नाव, पत्ता, -मेल पाठवून आपली मागणी नोंदवा.

Friday, June 13, 2014

गायतोंडे यांची बहिण म्हणते…

गायतोंडे ग्रंथात त्यांच्या भगिनी किशोरी दास यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. सुमारे नऊ ते दहाहजार शब्दांच्या लेखात त्यांनी गायतोंडे यांच्या विषयीच्या सर्वच आठवणी अतिशय भावूक होऊन लिहिल्या आहेत. आईचे निधन झाल्यावर अंत्यदर्शनाला देखील फिरकलेले गायतोंडे त्यातून जेव्हा दिसतात तेव्हा साहजिकच आपल्याला धक्का बसतो, अशा अनेक धक्कादायक गोष्टी या प्रदीर्घ लेखात किशोरी दास यांनी सांगितल्या आहेत. याच लेखातला हा अतिशय भिडणारा भाग खास तुमच्यासाठी 


"मग कधी वाटतंएकुलत्या एका भावाविषयीचं माझं दुःख, माझ्या तक्रारी निदान मी बोलून तरी दाखवू शकते. पण बाळचं काय ? शेवटपर्यंत तो अव्यक्तच राहिला. आपल्या कळणाऱ्या चित्रांतूनच परस्पर संवाद साधत राहिला. आयुष्यभर त्यानं कधी देवाला हात जोडला नाही, पण सगळे पाश तोडा, मायेत गुंतू नका, असं देवाचं वचन मात्र त्यानं तंतोतंत पाळलं. अर्थात हे करतांना त्याला सुखच झालं असेल असं नाही. रडताना त्याला मी कधी पाहिलं नाही. पण वडिलांसोबतच्या भांडणानंतरची एखादी तरी मध्यरात्र त्याच्या आसवांनी नक्कीच भिजली असेल, हे खात्रीनं सांगेन. त्याच्या अबोलपणामुळे दरवेळेस त्याच्या भोवती नव-नवी मिथकं गुंफली गेली. पण या मिथकांच्या चक्रव्यूहातून दरवेळेस तो चित्रकलेवरच लक्ष्य साधत आला. अर्थातच हे सोपं नव्हतं. मुळातच त्या चाळीतून भरारी घेऊन इथपर्यंत पोहोचणं हेच किती मुश्किल ! त्या चार भितींच्या कोंदणात तो फुललाही नसता. घरच्या जबाबदाऱ्यांत अडकला असता तर बाळ आजचा गायतोंडेही झाला नसता. पण तरीही त्या चार भिंतींनी त्याला काही तरी नक्कीच दिलं असेल. तिथल्या पोपडे उडालेल्या भिंतींत एखादा फॉर्म त्याला गवसला असेल. माळ्यावरच्या अंधारानं नजर रोवण्याचा निग्रह दिला असेल. तिथल्या गेलरीच्या कठड्यातून रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या आकाशानं स्वतःशीच संवाद साधण्याचं कौशल्य दिलं असेल; आणि तिथल्या जमिनीनं एकाग्रतेनं बसकण मारण्याची शक्तीत्याच्या दडपलेल्या इच्छा-आकांक्षांच्या, हरवलेल्या, करपून गेलेल्या एकाकी बालपणाच्या कित्येक जाचक हकिगती तिथल्या दगड-विटांच्या कोनाकोनात झिरपल्या असतील आणि त्यांनीच दिला असेल त्याला मूलमंत्र जगाशी फटकून राहण्याचा. मध्यंतरी त्या प्रेमामुळे कोवळिकतेचा पाझर त्याला फुटलेलाही. पण नियतीला तेही मंजूर नसावं; कारण तिला घडवायचा होता आजचा गायतोंडे. लाव्हा आतल्या आत खूप उकळावा आणि बाहेर पडल्यावर त्यानं थैमान घालावं, तसंच बाळच्या बाबतीत त्या खोलीतून बाहेर पडल्यावर झालं आणि त्या खोलीतून बाहेर पडून त्यानं त्याच्यापुरतं तरी जग जिंकलं. मग वाटू लागतं, ही खोली फक्त त्याचीच होती की काय ? जिनं फक्त त्यालाच घडवला. होय, घडवलाखऱ्या अर्थानं. आम्हाला फक्त मोठं केलंवयानं !!" 


तब्बल १०००० शब्दांचं हे अस्वस्थ करून टाकणारं आत्मकथन " गायतोंडे " ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरावं. आपण अजूनही हा ग्रंथ बुक केला नसेल तर ९००४० ३४९०३ या नंबरावर तुमचं नाव, पत्ता आणि इमेल एसेमेस करा आणि २० जून नंतर ३००० रुपयांचा हा ग्रंथ फक्त रु १६५० इतक्या घसघशीत सवलतीत घरपोच मिळवा. आता वेळ दवडू नका …..