Saturday, June 28, 2014

ही फ़क्त सुरुवात आहे…

गायतोंडेग्रंथासाठीचिन्हला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत पंडोल आर्ट गेलरीचे संचालक दादीबा पंडोल म्हणतात…” गायतोंडेंचा गॅलरिस्ट या नात्याने मला वेगळं असं काही वाटत नाही. माझ्या त्यांच्याबद्दलच्या मतातही फ़रक नाही. आणि असं आहे काळ स्वत:चा असा एक वेळ घेतो काही नियम एस्टॅब्लिश करण्यात. त्यांची स्वत:ची अशी एक नैसर्गिक गती असते तेव्हाच ते अस्तित्त्वात येतात. ते नियम असे की जे चांगलं आहे ते फ़ार काळ नाकारलं जाऊ शकत नाही. मात्र ते कधी आणि कसं मान्य होणार हे काळ ठरवतो. ज्याच्या त्याच्या नशिबात लिहून ठेवलेलं श्रेय त्याला मिळाल्यावाचून कधीच रहात नाही. मात्र ते ज्यावेळी आणि जितकं मिळायचं असतं तितकंच आणि तेव्हाच मिळतं. गडबड घोटाळे करुन तुम्ही गोष्टी वेळेच्या आधी घडवून आणू शकत नाही. एखादा सामान्य चित्रकार आहे आणि त्याच्या चित्राला असामान्य किंमत मिळाली हे एखाद्यावेळी घडून येतंही. पण एकदाच. पुन्हा तसं शक्य होत नाही. गायतोंडेंच्या बाबतीत तर मुळातच त्यांची कला श्रेष्ठ दर्जाची. मला तर वाटतं ही  फ़क्त सुरुवात आहे”.



३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ फक्त १६५० सवलत शुल्कात घ्यायची ही आता अखेरची  संधी. ९००४० ३४९०३ या चिन्हच्या मोबाईल नंबरवर तुमचा नाव, पत्ता, ई-मेल पाठवून  आपली मागणी नोंदवा.

1 comment:

  1. Why keep postponing sir? No fun in waiting. Kindly publish it now.

    ReplyDelete