Wednesday, June 11, 2014

तिनं भाऊबीज कधी केलीच नाही…


यांचं नाव आहे किशोरी गायतोंडेआताच्या किशोरी दासगायतोंडे यांची ही सख्खी  धाकटी बहिणती देखील जेजेतच शिकलीपण कमर्शियललातिच्यात आणि गायतोंडे  यांच्यात वीस वर्षांचं अंतर होतं१९७०/७१ साली गिरगावातलं घर सोडल्यानंतर  शेवटपर्यंत गायतोंडे घरातल्या कोणालाच भेटले नाहीतअगदी हिलासुद्धागायतोंडे   यांच्या निधनाची बातमी देखील तिला हस्ते पर हस्तेच कळली

त्यांच्या पाशी आता गायतोंडे यांचे काही फोटो, काही वर्तमानपत्रांची कात्रणं आणि बालपणीच्या काही आठवणी या खेरीज काहीसुद्धा नाही. होय !गायतोंडे यांची काही चित्र आहेत, पण ती देखील फाटकी तुटकी, मुख्य म्हणजे सह्या नसलेली. बहुदा गायतोंडे यांनी तेव्हा ती आपल्या लहान बहिणीला खेळायला दिली असावीत. त्या चित्रांनी तेव्हा भातुकलीचा खेळ खेळल्याचं आता त्यांना आठवतं.



बऱ्याच प्रयत्नानं ' चिन्ह 'नं त्यांना शोधून काढलं. आणि एक प्रदीर्घ आत्मकथन साकार झालं, जे ' गायतोंडेंच्या शोधात …'चं खास आकर्षण ठरलं. ज्यानं त्यांच्या दीर्घ मुलाखतीचं शब्दांकन केलं तो कमलेश नंतर सांगत होता.'मी छापायला देण्याआधी तो संपूर्ण लेख त्यांना वाचून दाखवला, तो ऐकला अन नंतर मात्र काही क्षण घरात मूक शांतता पसरली आणि नंतर नंतर ऐकू आला तो अस्फूट हुंदकाच . . . 

तब्बल १०००० शब्दांचं हे अस्वस्थ करून टाकणारं आत्मकथन " गायतोंडे " ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरावं. आपण अजूनही हा ग्रंथ बुक केला नसेल तर ९००४० ३४९०३ या नंबरावर तुमचं नाव, पत्ता आणि इमेल एसेमेस करा आणि २० जून नंतर ३००० रुपयांचा हा ग्रंथ फक्त रु १६५० इतक्या घसघशीत सवलतीत घरपोच मिळवा. आता वेळ दवडू नका ….


No comments:

Post a Comment