Wednesday, December 25, 2013

गायतोंडेचा पसारा


इतिहासाची बाजारवाट












गायतोंडेच्या दर्शनाने भारावले ठाणेकर



याज साठी केला होता अट्टाहास…


फिल्मचे स्क्रीनिंग ठाण्यात…



पुन्हा नामकरण

     अखेर आम्ही गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाचं नाव बदललंच . आता हा ग्रंथ " गायतोंडे " या नावानेच ओळखला जाईल . रूढार्थाने "गायतोंडे "यांचे चरित्र नव्हे ,गायतोंडे यांनी कुणालाच फारसं जवळ येवू दिलं नाही ,जे काही त्यांच्या आयुष्यात प्रसंग परत्वे आले ,त्यानाही त्यांनी कायम एका विविक्षित अंतरावरच ठेवलं ,त्यामुळे त्यांच्या विषयी सांगू पाहणाऱ्या ,लिहू पाहणाऱ्याना त्यांना ठाऊक असलेलेच "गायतोंडे "लेखनातून मांडता येतात. (याला अपवाद ठरू शकेल ते त्यांची मॆत्रीण ममता सरन याचं लिखाण ,पण पुस्तक काही येतच नाहीये ,आता त्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ते येईल असे सांगितले जाते ,तसे जर झाले तर ती आनंदाचीच गोष्ट ठरेल.) म्हणूनच "गायतोंडे" यांच्यावरचा अंक प्रसिद्ध करताना त्याला समर्पक असे "गायतोंडेंच्या शोधात…." हे समर्पक शीर्षक योजले होते. त्यांच्या वरच्या ग्रंथाला म्हणूनच तेच शीर्षक नक्की केले . पण आता इतक्या दिवसांच्या शोधाच्या प्रवासात एका क्षणी असे लक्षातगायतोंडे यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तुत्व इतकं विराट आहे की 'यांच्या नावापुढे 'च्या'लावल्या मुळे अभावितपणे आपल्याकडून अवमान तर होत नाही ना ?मध्यंतरी मुकुंद टांकसाळे यांचा फोन आला होता ,त्यांनी ही तीच शंका बोलून दाखवली . पण आता सारे कसे बदलावयाचे म्हणून ते सारे तसेच राहिले ,पण सुनील काळदाते यांची फिल्म पुन्हा पहिली आणि तत्काळ निर्णय घेतला ,कि आता नामकरण करायचेच आणि आम्ही ग्रंथाचे पुन्हा नव्याने नामकरण केले . "गायतोंडेंच्या शोधात …… " एवजी सदर ग्रंथ आता " गायतोंडे " या नावाने ओळखला जाईल .

चित्रपट चौकटीतला चित्रकार…

दरम्यान आणखी एक कात्रण हाती लागले आहे ,तेही येथे देत आहे .
हे कात्रण आहे ' साप्ताहिक लोकप्रभा ' १४ फेब्रुवारी १९९७ च्या अंकातले,
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी लिहिलेले. 
जरूर वाचा ………




Tuesday, December 24, 2013

आठवणी गायतोंडे यांच्या फिल्मच्या ……….

       लेखक -कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाच गायतोंडे यांच्या वरची फिल्म पहिल्यांदा दाखवली गेली. 



याचं कारण ते नुसते कलासमीक्षक नव्हते तर गायतोंडे यांचे चांगले मित्र होते , इतकंच नाही तर ते पहिल्या पासूनच गायतोंडे यांचे कट्टर चाहते होते. 



ती फिल्म पहिली मात्र अन ते प्रचंड प्रभावित झाले ,
आणि मग त्यांनी टाइम्स मध्ये फिल्मचं गुणगान करणारा एक लेख लिहिला बहुदा ३० जानेवारी १९९७ रोजी तो प्रसिद्ध झाला.

 


तोच हा लेख ज़ुनी कात्रणे चाळताना तो सहजच हाती आला, म्हणून इथं पोस्ट केला . 

दलाल श्रेष्ठ की मुळगावकर ?

        गायतोंडे यांना त्यांच्या बालामित्राने विचारले की "दलाल श्रेष्ठ का मुळगावकर ? "तर गायतोंडे यांनी त्यावर उत्तर दिलं … "असं काही नसतं रे , हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ असं काही ठरवायचं नसतं. चित्र आवडलं की चांगलं म्हणायचं आणि पुढे जायचं "


गायतोंडे यांचे बालमित्र शांताराम वालावलीकर यांनी चिन्हच्या "गायतोंडे विशेषांकासाठी सांगितलेला हा किस्सा जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचा आहे . गायतोंडे तेव्हा तिशीच्या उंबरठ्यावर होते .


किती प्रगल्भ विचार होते त्यांचे त्यावेळीही याचेच दर्शन त्यातून घडते . आज २०१३ साली सुद्धा असेच किवा हाच प्रश्न विचारणारे काही कमी भेटत नाहीत . 


"गायतोंडेंच्या शोधात …"मध्ये गायतोंडे यांचे असे शेकडो किस्से ठासून भरले आहेत, जे नुसते हसवत नाहीत तर तुम्हाला विचार करायलाही भाग पडतात, बरेच काही शिकवूनही जातात. 

गोष्ट गायतोंडेंच्या फिल्मची ….


      'गायतोंडे' यांच्या वरची फिल्म सुनील काळदाते करत होता तेव्हाची गोष्ट . शूटिंगच्या पहिल्या दिवशी कोलते सरही हजर होते . त्यांच्या स्टुडीओ मध्ये सर्वच वस्तूंवर पसरलेली ती प्रचंड धूळ पाहून आता हे सारे फिल्ममध्ये शूट होणार हे जाणून ,अस्वस्थ होऊनकोलतेसरांनी एक डस्टर हाती घेऊन ती पुसायला सुरवात केली, तर ते पाहून गायतोंडे म्हणाले 'कोलते', ते तसंच राहूदे , पुसायच नाही, मला तसंच आवडतं 'कोलते सर सांगतात 'मला जी घाण वाटत होती तो राखाडी धुळीचा थरत्यांच्या दृष्टीनं जणू "सिल्व्हर "होता असंच वाटलं मला क्षणभर .त्यांनी ज्या तातडीने मला रोखलं ते पाहून , त्याच क्षणी मला त्यांच्या पेंटिंग मधला तो अगम्य सिल्व्हर आठवला , जो कुठून येत होता हे मला कळलं नव्हतं तो सिल्व्हर. 'सुनील काळदाते पण ग्रेटच त्यानं ते सारं जसंच्या तसं शूट केलं ,आणि 'गायतोंडे 'यांच्यावर एक अजरामर फिल्म तयार झाली ,जी पुढे जगभरच्या फिल्म फेस्टिवल्स मध्ये प्रचंड गाजली .सुनील एकदा सांगत होता...पेंरिस बीएनालेत तर जगभरातील ८०० फिल्म मधून ज्या ४० फिल्मनिवडल्या गेल्या त्यात ती होती . परदेशात जिथे जिथे ती दाखवली गेली तिथे तिथे प्रेक्षकांनी फिल्म संपल्यावर उभं राहून मानवंदना दिली. सुनीलने शूटिंगचा साराच अनुभव गायतोंडे यांच्या वरच्या 'चिन्ह ' च्याआगामी पुस्तकात शब्दांकित केला आहे .   त्याच फिल्म मधले हे प्रकाशचित्र .