Saturday, June 28, 2014

‘गायतोंडे’ यांचं श्रेष्ठत्व हुसेन यांनाही मान्य होतं…


गायतोंडेग्रंथासाठीचिन्हला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत पंडोल आर्ट गेलरीचे संचालक दादीबा पंडोल म्हणतात… “गेल्या पिढीतले ज्येष्ठ चित्रकार बहुतेक आता आपल्याला सोडून गेले आहेत. पण या सगळ्यांवरुन एक नजर फ़िरवली आणि मागे वळून पाहीलं तर मला गायतोंडे अजूनही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. अजूनही ते ग्रेटेस्ट आर्टिस्टच आहेत. इतके की मला त्यांच्यानंतरचं दुसरं नावही पटकन सांगता येत नाही. मी त्यांना आजही सर्वश्रेष्ठ चित्रकारच मानतो.

आता खरं असं आहे की हुसेनच्या बाबतीत मी खूप पार्शल आहे. ते मी कबुलच करतो. त्याची आर्ट मला खूप आवडते. पण मी हुसेनलाही हे सांगीतलं होतं की I consider Gaitonde as India’s greatest artist. त्यावर तोही म्हणाला की या तुझ्या विधानात नाकारण्यासारखे काहीच नाही, त्यावर चर्चाही होऊ शकत नाही.

हुसेनच्या बाबतीत एक गोष्ट अतिशय मानण्यासारखी होती की तुम्ही त्याच्याजवळ इतर चित्रकारांच्या गुणवत्तेचं, श्रेष्ठत्वाचं मनमोकळं कौतुक करु शकत होता. हुसेन आपल्यापेक्षा त्यांच्यामधे काय जास्त चांगलं आहे हे स्वत:हून कबूल करायचा. बौद्धीक पातळीवर सूझा, तय्यब, गायतोंडे आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत हे तो मान्य करायचा. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो असं सांगायचा. त्याने हे ऑन रेकॉर्ड म्हटलं आहे की सूझाने त्याला प्रोग्रेसिव्हमधे घेतलं नसतं तर तो आज कुठेच नसता. सूझाने त्याच्यातलं वेगळेपण ओळखलं होतं”.


३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ फक्त १६५० सवलत शुल्कात घ्यायची ही आता अखेरची संधी. ९००४० ३४९०३ या चिन्हच्या मोबाईल नंबरवर तुमचा नाव, पत्ता, -मेल पाठवून आपली मागणी नोंदवा.

No comments:

Post a Comment