Monday, May 19, 2014

गायतोंडे आणि ' फेक ' फेकाडे

गायतोंडे आयुष्यभर पेंटिग्ज हाच एकमेव ध्यास घेवून जगले. 
त्यासाठी जो काही त्याग करायला हवा होता तो त्यांनी केला, अगदी आयुष्यभर केला. सर्व नातीगोती पाश त्यांनी तोडून टाकले आणि दिल्लीतल्या साध्याशा बरसातीत आयुष्यभर कलासाधना करीत राहिले. ललित कलावाल्यांनी त्यांना कमिटीत घेतलं, हे एकाही मिटींगला गेले नाही. सरकारनं त्यांना सिनेमाच्या सेन्सार बोर्डावर घेतलं हे एक देखील सिनेमा पाहायला गेले नाहीत. पेंटिग खेरीज अन्य काही करावयाचंच नाही हे त्यांनी ठरवून टाकलं आणि शेवटपर्यंत ते त्यालाच चिकटून राहिले. बरं पेंटिग्ज तरी किती वर्षाला फक्त सहा ती देखील कॅनव्हासवर आणि ते कॅनव्हास देखील मोठे, बारीकसारीक काम नाहीच. फार तर सातवं पेंटिग त्यांनी कधी केलं तर, नाहीतर सहाच, कारण मुंबईला पाठवताना ते समोर समोर ठेवून तीन जोड्या पाठवायला देखील सोपे जावे म्हणूनही असेल कदाचित. बस. रेखाटनं काही केली तर ती, बाकी काही नाही. हे सारं मला आधीपासून ठाऊक होतं, त्यांचा सहवास लाभलेल्या अनेकांनी ते सांगितलं होतं. 



पण परवा दादिबा यांचा लेख आला आणि ते सारे कन्फर्म झालं. पण मग आता दीड- दोन किंवा दोन - तीन फुटांची जी किडूक मिडूक पेंटिग्ज गायतोंडे यांची म्हणून मार्केट मध्ये फिरताहेत ती गायतोंडे यांनी केली तरी कधी ? अर्थ उघड आहे ती सारी पेंटिग्ज ही फेक पेंटिग्जच आहेत . हे सारे भयंकर आहे . गायतोंडे यांच्या सारख्या जिनियस चित्रकाराचा तो केला गेलेला भयंकर अपमान आहे. जे आणि जसं आयुष्य गायतोंडे जगले त्याचं यथार्थ चित्रण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानंच या " गायतोंडे " ग्रंथात केलं आहे. ते वाचल्यावर तर ज्यांनी कुणी हे गायतोंडे यांच्या चित्रांचे कारखाने काढले आहेत त्यांच्या विषयीचा संताप अनावर होतो. पैशाच्या लालसेपोटी ज्या चित्रकारांनी ही अत्यंत नीच, घृणास्पद आणि शरमेनं मान खाली घालावयासलावणारी कृत्ये केली आहेत.



त्यांना एक सूचना आहे, किंवा त्याला ईशारा देखील म्हणावयास हरकत नाही "गायतोंडे" ग्रंथात आम्ही त्यांची ६० - ६५ पेंटिग्ज प्रसिद्ध करतो आहोत, अन्य तीन प्रकाशक जी तीन पुस्तके प्रकाशित करीत आहेत त्यात आणि गुगेनहेम म्युझियम जो कॅटलॉग प्रसिद्ध करीत आहे त्यात गायतोंडे यांची बहुत्येक सर्वच पेंटिग्ज प्रसिद्ध होतील यात शंकाच नाही , तेव्हा तुम्ही तुमचे हे लघुउद्योग आता आवरा नाही तर एक ना एक दिवस तुरुंगात जाऊन पडाल हे नक्की . जे भारतीय कलेच्या इतिहासात कधी घडले नाही असे बरेच काही गायतोंडे यांच्या बाबतीत अलीकडे घडले आहे . त्याची अगदी नावनिशीवार अचूक माहिती ' चिन्ह ' पाशी उपलब्ध आहे , पण तूर्त तरी आम्ही ती जाहीर करू शकत नाही कारण त्या बाबी न्यायप्रविष्ट आहेत . काही प्रकरणं पोलिसांपर्यंत पोहोचली आहेत. वेळ येईल तेव्हा हे सारे आम्हीच 'चिन्ह ' मधून जाहीर करू हे निश्चित समजा. ' गायतोंडे ' ग्रंथ प्रसिद्ध होई पर्यंत अशा अनेक उचापतखोर मंडळींचे उद्योग इथून वेगळ्या पद्धतीनं जाहीर करावयाचा विचार आहे, पाहूया कितपत जमते ते. 

बाय वे "
गायतोंडे" ग्रंथ आपण बुक केला का ? नसेल तर आज नाही आत्ता करा. फक्त एक एसेमेस पाठवा तुमच्या नाव पत्ता आणि इमेलसह , आणि संदेश लिहा 'NKG' बस ……

ही सर्व गायतोंडे यांची मूळ (Original) चित्रे आहेत.

तुमच्या हाती जो " गायतोंडे " ग्रंथ पडेल तो असा असेल ….



गायतोंडे यांचा शोध आता या टप्प्यावर आम्ही थांबवलाय 
तसा तो थांबणारा नाहीये 
आणि आम्हीही तो थांबवणार नाहीयोत 
पण मराठी ग्रंथ प्रकाशित झाल्यावर इंग्रजीच्या कामाला सुरुवात होताच
तो पुन्हा वेगळ्या पद्धतीनं सुरु राहिलंच 

फायनली मराठी ग्रंथात आता हे लेख प्रसिद्ध होत आहेत 
किशोरी (गायतोंडेदास 
सुनिता पाटील 
फिरोज रानडे 
विश्वास यंदे 
शांताराम वर्दे वालावलीकार 
प्रफुल्ला डहाणूकर
मनोहर म्हात्रे 
सच्चिदानंद दाभोळकर 
नरेन्द्र डेंगळे
सुनील काळदाते 
नितीन दादरावाला 
ज्ञानेश्वर नाडकर्णी 
लक्ष्मण श्रेष्ठ 
आणि 
दादिबा पंडोल 
यांचे लेख या ग्रंथात अंतिमतः समाविष्ट झाले आहेत. 
या शिवाय 
गायतोंडे यांनी स्वतः लिहिलेला एक लेख 
निसर्गदत्त महाराजांसोबत झालेला त्यांचा एक संवाद 
गायतोंडे यांच्या सहा मुलाखती 
गायतोंडे यांच्यावर प्रकाशित लेखांची सूची 
एव्हडं अवांतर साहित्य अखेर या ग्रंथात प्रसिद्ध होत आहे. 

आणि हो प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना आहेच 
संपादक म्हणून गायतोंडे यांच्या शोधाचा आजवर झालेला 
प्रवास सांगणारा माझा प्रदीर्घ लेख देखील ग्रंथात आहेच 
आधी आम्ही २०० पानात हे सारे बसवायचे ठरवले होते. 
पण फायनली आता ते सारे २४० पानांवर येवून ठेपले आहे 
त्यामुळे निर्मिती खर्च वाढला आहे . पण आता आम्ही किंमत वाढलेली नाहीय 
गायतोंडे यांची ५० पेक्षा जास्त दुर्मिळ प्रकाशचित्र आम्ही यात वापरली आहेत 
आणि मुख्य म्हणजे त्यांची ७० पेंटिग्ज आम्ही प्रकाशित केली आहेत. 



होय 
मराठीत आजवर असं धाडस कुणी केलेलं नाहीय हेही आम्ही आपल्या 
निदर्शनास ( अर्थात नम्रपणे ) आणून देवू इच्छितो.
माझ्या पत्रकारितेच्या आणि संपादनाच्या ३४- ३५ वर्षाच्या कारकिर्दीतलं 
हे सर्वात श्रेष्ठ काम आहे असं मी मानतो.
अशा संधी कुणाला सहजासहजी लाभत नसतात. 
माझ्या सुदॆवानं अशा संधी मला दोन वेळा लाभल्या . 
त्यातली एक म्हणजे " गायतोंडे " आणि दुसरी म्हणजे " भास्कर कुलकर्णी " 
' निवडक चिन्ह ' मालिकेचं समापन " भास्कर कुलकर्णी " ग्रंथानंचं करावं 

असा एक विचार मनात आला आहे. 
माझ्या मते हे दोन ग्रंथ ज्यांना आयुष्यात वेगळं काही तरी करावयाचं आहे, 
मग ते क्षेत्र कुठलंही असो , चित्रकलाच असायला पाहिजे असे नाही तर जीवनातले कुठलेही, 
पुढील शेकडो पिढ्याना ते एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग- दर्शन करीत राहतील…. 

अजूनही आपण आपली प्रत बुक केली नसेल तर आज नव्हे आत्ताच्या आत्ता
फक्त तुमचं नाव पत्ता आणि इमेल असलेला smsपाठवून करा 
आमचा मोबाईल नंबर आहे ९००४० ३४९०३ 
आता १७ मे पूर्वी कराल तर घसघशीत रु ८५० सवलत मिळवाल. 

जाता जाता एवढंच सांगतो हा ग्रंथ परिपूर्ण व्हावा यासाठी आम्ही काहीही करावयाचे शिल्लक ठेवलेले नाही. 
या ग्रंथाची छपाई जास्तीत जास्त सुंदर व्हावी यासाठी नेहेमी ज्या प्रेस मध्ये ' चिन्ह 'चे अंक छापले जातात. 
तेथे करता जिथे प्रदर्शनांचे केटलोग्ज, कला पुस्तके छापली जातात तेथे करतो आहोत. 
थोडक्यात आम्ही आमचं काम पूर्ण केलं आहे. 
आता तुमची टर्न ………