हा अतिशय दुर्मिळ असा फोटो मला पळशीकर काकूंनी दिला. पळशीकर काकू म्हणजे शंकर पळशीकरांच्या पत्नी. त्यांचा एक लेख 'चिन्ह'च्या 'कालाबाजार' अंकात मी प्रसिध्द केला होता. डीन बंगल्यातल्या दिवसांविषयीचा, तेव्हा त्यांनी मला तो दिला होता. हा फोटो कला इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या १९४७-४८ सालच्या डिप्लोमाच्या वर्गाचा हा अखेरच्या दिवशी घेतलेला फोटो आहे. तेव्हा तसे फोटो घ्यायची प्रथा होती. काळाबरोबर सारं काही बदलत गेलं आणि ती प्रथाही नष्ट झाली. खरं तर तेव्हा केमेरासारखी साधनं इतकी रुळली नव्हती. पण डॉक्युमेंटेशनची दूरदृष्टी होती. आता हातातल्या मोबाईलमध्ये पाहिजे त्या दर्जाचा केमेरा असतो असतो, पण अशा डॉक्युमेंटेशनचं महत्व मात्र समजेनासं झालेली पीढी उच्चपदस्थांच्या जागी विराजमान झाली आहे. त्यामुळे असं फोटो-बिटो काढणं फारच दुर्लभ झालं आहे.
तर काय सांगत होतो हा जो फोटो आहे ते १९४७-१९४८ सालच्या पेन्टिंगच्या वर्गाचा. ज्यात दिसतायत ते प्रा. धोपेश्वरकर, भोसुले मास्तर, प्रा. नगरकर, प्रा. आडारकर, प्रा. अडुरकर, प्रा. फर्नांडीस, प्रा. अहिवासी, प्रा. प्रल्हाद अनंत धोंड, प्रा. बाळकृष्ण शिरगांवकर आणि त्या वेळच्या विद्यार्थ्यांत दिसतायत ते वसंत पळशीकर, प्रख्यात चित्रकार सैय्यद हैदर रझा आणि द ग्रेट गायतोंडे त्यातले ते नेमके कोण ? हे पहायचं असेल तर फोटोखालच्या ओळी वाचा.
ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्वाचा असा ठरलेला हा फोटो मी 'गायतोंडे' ग्रंथात आवर्जून घेतला आहे. खरं तर दोन पानांच्या स्प्रेड मध्ये मी तो छापणार होतो, पण त्यामुळे साहजिकच फोटोचे दोन भाग पडणार होते आणि त्यातल्या काही जणांचे चेहरे मधोमध कापले जाणार होते. बाईंडिंग कितीही परफेक्ट झाले तरी काहीतरी त्रुटी त्यात राहून गेली असती म्हणून माझे स्नेही चित्रकार रंजन जोशी यांच्या सूचनेवरून ती कल्पना रद्द केली आणि एकाच पानात तो फोटो प्रसिद्ध केला आहे. 'गायतोंडे' ग्रंथात जे काही अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत त्यातला हा सर्वात महत्वाचा फोटो ठरावा.
कसं असतं पहा. खूप मोठी स्वप्न, आशा-आकांक्षा, महत्वाकांक्षा उराशी घेऊन लोकं जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या शिक्षण संस्थेत येतात. जेजेत प्रवेश घेणाऱ्या साऱ्यांनाच मोठं चित्रकार व्हायचं असतं, पण नंतर आयुष्याची चक्र अशी काही फिरत जातात की कोणं कुठं कसं फेकलं जातं ते कुणालाच कधी कळत नाही.
या फोटोतल्या शिक्षकांना आपण बाजूला काढू. फक्त तेव्हाच्या विद्यार्थ्यांचा विचार करू तर काय दिसतं ? या २५-३० विद्यार्थ्यांपैकी सुभद्रा आनंदकर मरिनलाईन्सच्या हिंद विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून शिकवत होत्या, एवढचं कळलं , स्मार्त यांनी लिहिलेलं चित्रकलेचं पुस्तक आपणास ठाऊक आहेचं. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. पळशीकर सरांविषयी तर आपल्याला साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण रझा आणि गायतोंडे या दोन नावांखेरीज इतरं विद्यार्थ्यांचं काय ? त्यातले किती चित्रकार झाले किंवा त्यातल्या किती जणांनी चित्रकलेशी संबंधित क्षेत्रात नावं कमावलं ? या प्रश्नांची उत्तर शोधायला गेलो तर अस्वस्थतेपणाखेरीज काहीच हाती येणार नाही.
चित्रकला ही देखील वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हे. ज्यानं त्यात आयुष्य ओतलं त्यांनाच पुढं काही तरी मिळालं. गायतोंडे तर त्यालाही पुरून उरले. नाव-मानमरातब, मोठेपण कशा कशाचीही पर्वा न करता ते पुढं पुढं जात राहिले. आणि आज सारं जग त्यांच्या मागे लागलंय. ग्युगेनहाईम म्युझियममध्ये २४ ऑक्टोबर रोजी त्याचा रिट्रोस्पेक्टीव्ह शो सुरु होऊ द्या. मग पहा पिकासो सारखीच 'गायतोंडे' ही सही देखील जगभर दिसू लागेल की नाही ते.
पण या साऱ्याचीचं किंमत प्रारंभापासूनच मोजावी लागते. गायतोंडे यांनी तर ती अगदी आयुष्यभर पुरेपुर मोजली. ज्यांना हे 'मोजणं' जमलं नाही, ते या क्षेत्रापासून दूरदूर होत गेले. बाहेर फेकले गेले. आणि हे असेच फक्त फोटोत उरले. जेजेतल्या नंतरच्या कुठल्याही बेचकडे पहा याच इतिहासाची पुनरावृत्ती होतांना दिसतेय….

No comments:
Post a Comment