Friday, October 31, 2014

‘गायतोंडे’ : फेक पेंटिंग पुराण…



अखेरीस काल रात्री १० वाजता गायतोंडे ग्रंथाचं काम संपलं. तयार झालेल्या डमीत जवळजवळ ४० ते ५० टक्के इतक्या सुधारणा कराव्या लागल्या आणि आम्ही त्या केल्या म्हणूनच हा इतका वेळ लागला. गायतोंडे यांच्या पेंटिंगच्या काही इमेजेस बदलाव्या लागल्या, काही नव्याने भर घातल्या. काही नवीन फोटोही हाती आले, तर काही अपरिहार्य कारणामुळे काढून टाकावे लागले. इतकी प्रचंड काळजी घेऊनसुद्धा डमी हातात आल्यावर एक दोनफेकपेंटिंग यात घुसली आहेत की काय असाही संशय आला. तो दूर व्हावा यासाठी नवीन चित्रांची भर घालणे सोप्पे होते तेच आम्ही केले. आता आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो यात एकहीफेकपेंटिंग नाही. हा ग्रंथ प्रसिद्ध करतांना जो प्रचंड विलंब लागला त्याला हेच मुख्य कारण होतं. ‘फेकचित्रं खरं खोटं ठरवण्याची कुठलीच यंत्रणा भारतात अस्तित्वात नसल्यानं डोळ्यात अगदी तेल घालून सर्वतोपरी काळजी घेणं अत्यंत अत्यंत अत्यावश्यक होतं आणि तेच आम्ही केलं. प्रसिद्ध केलेल्या सुमारे ६४ चित्रांमध्ये एक जरी फेक चित्र शिरलं असतं तर या ग्रंथासाठी घेतलेली इतक्या वर्षाची सगळीच मेहनत पाण्यात गेली असती आणि आयुष्यभर पुस्तक चांगलं आहे पण चित्रफेकआहेत हे ऐकून घेण्याची वेळ आली असती. यामुळेचिन्हनं आजवर जपलेली विश्वासार्हता गमावली असती ती वेगळीच.

गायतोंडे यांनी संपूर्ण आयुष्यभरात फारतर ३०० ते ४०० पेंटिंग रंगवली असतील असं आम्हाला वाटतं. ( हे विधान गेल्या - वर्षाच्या अभ्यासातूनच केलेलं आहे.) पण सध्या आर्ट मार्केट मध्ये मात्र त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट संख्येनं गायतोंडेंची चित्रफेकचित्र म्हणून धुमाकूळ घालत आहेत. अर्थात तो विषय संपूर्ण वेगळा असल्याने त्याविषयी आता मी काही बोलू इच्छित नाही. पण एवढं मात्र अगदी आत्मविश्वासानं आम्ही सांगतो यागायतोंडेग्रंथातील सर्वच्या सर्व पेंटिंग गायतोंडे यांचीच आहेत. आणि ती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं छापली जावीत यासाठी आम्ही काहीही करायचे शिल्लक ठेवलेले नाही. आधीची कल्पना अशी होती की, गायतोंडेंची सर्वच्या सर्व उपलब्ध चित्रे ग्रंथाच्या अखेरीस थंबनेल स्वरुपात प्रसिद्ध करावीत. पण या संदर्भात घडत असलेल्या एकाहून एक भन्नाट-भयंकर घटना पाहिल्यावर ती कल्पना बासनात बांधून ठेवावी लागली. ग्रंथ निर्मितीच्या काळात नंतर घडलेल्या अशा साऱ्याच घटना आम्ही आपल्याशी शेअर करणार आहोत, आधीच्या घटना या ग्रंथासोबत दिल्या जाणाऱ्या विशेष लेखाच्या पुस्तिकेत समाविष्ट केल्या आहेत.

No comments:

Post a Comment