Wednesday, May 7, 2014

बस ! अब थोडासा इंतजार …….


फायनली गायतोंडे यांच्यावरचा दादिबा पंडोल यांचा लेख हाती आला आहे, कदाचित अपेक्षा केली होती त्या पेक्षा भन्नाट आहे. दादिबानी अत्यंत लहानपणापासूनच गायतोंडे यांना अगदी जवळून पाहिलं असल्यामुळे अन्य लेखात नसलेल्या असंख्य बाबी यात एकवटल्या आहेत. आता मी त्याची उदाहरणं देवू शकत नाही कारण मला तो ग्रंथात घेण्यासाठी जे काही करावे लागते ते सारे करावयाचे आहे, आणि ती प्रक्रिया खूप मोठी आणि लांबलचक असते आणि तिला मला आता अधिक वेळ द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही तो आता ग्रंथातच वाचणे श्रेयस्कर. 


आता या निर्णयामुळे प्रकाशनाला आणखी १० - १५ दिवस उशीर होणार हे नक्की. पण' चिन्ह'चं प्रकाशन म्हणजे एव्हडा उशीर लागणारच हे आता' चिन्ह' चे वाचक धरूनच चालत असावेत . त्यांना कल्पना असते कि एव्हडा उशीर म्हणजे म्हणजे अपेक्षेपेक्षा काहीतरी आणखी जास्त मिळणार, आणि त्यांना ' चिन्ह' नं कधीच निराश केलेलं नाही. या वेळीही असेच होणार आहे, आधी हा ग्रंथ २०० पानांचा असेल असं आम्ही जाहीर केलं होतं. पण पसारा एव्हडा वाढत गेला कि २४ पाने वाढवावीच लागली. आता या नव्या लेखामुळे आणखी २४ पानं वाढवावी लागणार बहुदा असे दिसतेय. त्या मुळे जसा मजकूर वाढतोय तशीच ग्रंथातल्या गायतोंडे यांच्या चित्रांची संख्या देखील वाढते आहे. गायतोंडे यांची तब्बल ६५ पेंटिग्ज या ग्रंथात आम्ही घेतली आहेत, ज्या पद्धतीनं या ग्रंथाचं डिझाईन आम्ही केलं आहे तसंच ठेवायचं असेल तर आणखी काही पेंटिग्ज आम्हाला त्यात घ्यावीच लागणार आहेत, असं काही घडू शकेल याचा अंदाज घेवून आम्ही ती तयारी देखील करूनच ठेवली होती. 


जरी पानं वाढली असली तरी ज्यांनी हा ग्रंथ ज्या रकमेला बुक केला आहे त्यांना तो त्याच किमतीत मिळणार आहे. प्रिंट ऑर्डर वाढवल्यामुळे ज्या ४०० प्रतीचं बुकिंग आता आम्ही आता रु १६५० ने करून घेत आहोत तेही तसेच ठेवत आहोत. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर कदाचित आम्हाला त्याची किंमत वाढवावीच लागेल पण तो निर्णय छपाई पूर्ण झाल्यावर घ्यायचा असे आम्ही ठरवले आहे. त्या मुळे ज्यांनी कोणी अद्यापही हा ग्रंथ बुक केला नसेल त्यांनी तो त्वरित करावा हे आवाहन. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर अनेक मंडळी सवलत मागतात, आर्जवं करता, ओळखी काढतात, पण या वेळी तर ते अजिबात शक्य नाही. अशा मंडळीनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा ही त्यांना विनंती आहे. 

या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ हा मोठा इव्हेंट व्हावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहोत , आणि तो तसा होईलच हेही खात्रीनं सांगतोय. आमच्या या प्रयत्नांची कुणकुण लागलेल्या पत्रकारांकडून दर आठवड्याला नेमानं चौकशी करणारे फोन देखील येवू लागलेत. त्यांना थोपवून धरता धरता नाकी नऊ येवू लागलेत.

बस ! अब थोडासा इंतजार ….

No comments:

Post a Comment