Saturday, August 3, 2013

लोकांचंही अडू शकतं


लोकांचंही अडू शकतं


एक असं माणूस जे जगावर रुसलं आणि रुसूनच बसलं.आधी घरच्यांना वाटलं,'चssट येईल,जाईल कुठं?पण अं हं.मग कुणी काही कुणी काही प्रयत्न केले.पण नाहीच सगळे ते उपयोगाला आले.शेवटी लोकं म्हणली,काय करणार?आणि ती लागली आपापल्या कामाला.


जाता जाता खूप वेळ गेला.मग त्यानं आणि लोकांनी दिलं सोडून एकमेकाला.एव्हढं असेल तर बसच.दोघांनी ठरवलं.त्यानंही आणि लोकांनीही.कुणाचंच काही अडेना.ना लोकांचं,ना ह्याचं.या समाजप्रिय प्राण्यांच्या जगात एकमेकांवाचून न अडणंच महत्वाचं ठरलं आणि हा आपल्या-आपल्यात आणि लोकं त्यांच्या-त्यांच्यात असंच झालं.त्यांनीही हे बरोबर व्हावं म्हणून खूप काय-काय केलं.आपापल्या परीनं सगळं करून पाहिलं.पण नाही जमलं काही.सगळं हुकतच गेलं.ह्या सगळ्यात एक मात्र झालं,"लोकांचंही अडू शकतं,हे यातून स्पष्टच झालं."

एक आख्खं आयुष्य आपल्यात असं जगून गेलं.आपल्याला जसं वाटतंय ना हे बरोबर नाही झालं,तसंच त्यावेळीही काहीजणांना मनापासून वाटलं.


                                                                      वासुदेव गायतोंडे एक 'मिथ' बनून राहिलं!!



No comments:

Post a Comment