Saturday, August 3, 2013


विक्षिप्त हात होता त्याचा, फक्त दोनच रेघा होत्या त्याच्या हातावर!



"गायतोंडेला मी तोंडावर सांगायचो...",10 वर्ष टेल्कोचे पब्लिसिटी हेड त्यानंतर 13 वर्ष एअर इंडियाचे डेप्युटी डायरेक्टर पब्लिसिटी अशी पदं भूषवलेले आणि या सगळ्यापेक्षा आधी गायतों
डेंचे विद्यार्थी आणि नंतर गायतोंडेंचे मित्र असल्याचा अभिमान बाळगणारे सच्चिदानंद दाभोळकर त्यांच्या गायतोंडे यांच्यावरच्या ‘चिन्ह’मधल्या लेखात सांगतात, मी त्याला म्हणायचो, "तुझा हातच विक्षिप्त आहे. त्याला तू तरी काय करणार आणि मी ही. होताच त्याचा हात विक्षिप्त. आपल्या हातावर कशा तीन तीन मुख्य रेघा असतात line of heart, line of head and line of life, याच्या हातावर फक्त दोनच रेघा. तिसरी रेघच नाही. आता असल्या हाताला विक्षिप्त नाही म्हणायचं तर काय म्हणायचं काय? असं असलं तरी की म्हणूनच पण त्याच्या हातात विलक्षण जादू होती. त्याचं बेसिक जबरदस्त पॉवरफुल होतं. त्याच्या पक्क्या ग्रामर मुळेच तर तो फिगरेटिव्हकडून अ‍ॅबस्ट्रॅक्ट्कडे वळला तरी त्याचं अ‍ॅबस्ट्रॅक्ट भाव खाऊन गेलं."


गायतोंडे या कलावंताच्या कलाकॄतींचं त्यांच्या कलंदर आयुष्याचं गूढ प्रत्येक भारतीय चित्रकाराला आव्हानात्मक वाटत आलंय. ‘चिन्ह’नं आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या कलातपस्वींना मानवंदना देण्यासाठी एक संकल्प सोडलाय. या रौप्यमहोत्सवी वर्षात गायतोंडे यांच्यावर एक कॉफीटेबल बुक प्रकाशित करायचं. त्यांची 40 हून अधिक पेंटिंग्ज आणि गायतोंडेंवर मान्यवरांचे लेख आणि ‘चिन्ह’ची दॄष्ट लागावी अशी निर्मिती असणारं हे पुस्तक म्हणजे प्रत्येक कलारसिकासाठी पर्वणीच ठरणार आहे.



आपली प्रत आजच बुक करण्यासाठी आपल्या मोबाईलवरून 'NKG' असा एक sms आपल्या नाव-पत्ता-ईमेल आयडीसह ‘चिन्ह’च्या '9004034903 या मोबाईल क्रमांकावर आत्ताच पाठवून द्या, किंवा 
http://www.chinha.in/english/nivadakbooking.php या लिंकवर क्लिक करून आपण आपली नोंदणी ऑनलाईनही करू शकता.

No comments:

Post a Comment