Saturday, August 3, 2013

‘गायतोंडेंच्या शोधात... मुखपृष्ठ तयार झालं.
‘निवडक चिन्ह’ मालिकेतील तीन खंडांपैकी ‘चित्रकार गायतोंडे यांच्यावरच्या ‘गायतोंडेंच्या शोधात...’ या ग्रंथाचं हे मुखपृष्ठ. गायतोंडे यांचं हे प्रकाशचित्रं टिपलं आहे पॅरिस निवासी चित्रकार सुनील काळदाते यांनी 1990 च्या दशकांत जेव्हा ‘गायतोंडे’ यांच्यावर फिल्म केली त्यावेळी. या ग्रंथाच्या जॅकेटवर मागील बाजूलाही चित्रकार ‘गायतोंडे’ यांचं अतिशय दुर्मिळ प्रकाशचित्र आहे. तेही गायतोंडे यांच्या निजामुद्दीनमधील बरसातीच्या प्रवेशद्वारात टिपलेले. ‘गायतोंडेंच्या शोधात’ हा ग्रंथ आता निर्मित्तीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. कधी प्रसिद्ध होणार? वगैरे लवकरच जाहीर करीत आहोत...
या ग्रंथाविषयी माहिती मिळावयाची असेल तरhttp://chinha.in/marathi/archive2006.html इथं क्लिक करा. आणि ग्रंथाची मागणी नोंदावयाची असेल तर 9004034903 या मोबाईलवर `NKG'=1 असा मेसेज स्वत:च्या नाव-पत्त्यासह पाठवा. मूळ मूल्य रू 2000, सवलत मूल्य(31 जून पर्यंत) फक्त 1450.

No comments:

Post a Comment