Wednesday, April 9, 2014

लक्ष्मण पै नुकतेच जर्मनीला गेले…







गोव्यातल्या एका स्नेह्यांनी एक फोटो पाठवलाय, पहा म्हणाले. त्या फोटोत गायतोंडे यांच्या सोबत पळशीकर आणि लक्ष्मण पै आहेत. या फोटोच्या शोधातच मी होतो. किंबहुना या लक्ष्मण पैंच्याच शोधात मी होतो. पण खूप उशिरा त्यांचा अत्तापत्ता हाती आला. दिल्लीतल्या ज्या व्यक्तीला त्यांच्याशी बोलायला सांगितले, त्याला काही त्यांच्याशी बोलायला जमलं नाही. हे त्यानंही खूप उशिरा कळवले. तो पर्यंत प्रकाशनाची तारीख जवळ आलेली. आणि मग दिल्लीला स्वतः जाऊन ते करणं काही जमलंच नाही. आता गायतोंडे ग्रंथाच्या वेळी त्यांचा माग काढायचा प्रयत्न केला पण तेही जमले नाही.

मग गोव्यातील एका स्नेह्यांचा कानावर हे सारे घातले. गायतोंडे आणि लक्ष्मण पै या दोन्ही जानी मित्रांना ते ओळखत होते. त्यांनी पैंच्या पुस्तकातील हा फोटो मला मेल केला आणि वर लिहिले की, "लक्ष्मण पै अद्याप हयात आहेत" (हा टोमणा बहुधा त्यांनी लक्ष्मण पैंच्या मृत्यूचे वर्ष चक्क कोशात जाहीर केलय त्यांना असावा.) आता त्याचं वय ८८ वर्ष आहे. नुकतेच ते जर्मनीला आपल्या मुलांकडे निघून गेलेत. पुन्हा ते भारतात परततील अस काही वाटत नाही. जाताना त्यांनी आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या काही प्रती आपल्या मित्रांना पाठवल्या. त्यातली एक प्रत त्यांनी पोस्टाने मला पाठवली. तुम्ही त्यांच्याविषयी विचारलं होतं म्हणून हे लिहीलं इतकंच.

एखादा विषय हातून निसटल्याचं दुखः काय असतं हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. गायतोंडे यांच्या ग्रंथात राहिलेलं हे न्यून मला जन्मभर छळणार हे निश्चित.

No comments:

Post a Comment