Wednesday, April 9, 2014

" गायतोंडे " ग्रंथ ; फायनल काउंट डाऊन ११ पासून सुरु ……


'गायतोंडे' ग्रंथाचा फायनल काउंट डाऊन गुरुवार पासून सुरु करीत आहोत.
आमचं काम आता संपलेय, छपाई, बाईंडिंग, प्रकाशन समारंभाची पूर्व तयारी यात अगदी सहज महिना जाणार आहे. आता पर्यंत कुणी घडवला नसेल असा जंगी प्रकाशन सोहोळा घडवून आणावयाचा विचार आहे. 'चिन्ह' च्या एखाद्या प्रकाशनाला गेल्या २६ वर्षात कधीच नव्हती इतकी अनुकूल परिस्थिती यंदा किंवा आता लाभली आहे. आवृत्तीही सवलत योजनेतच सारीच्या सारी बुक झाली आहे. प्रिंट ऑर्डर वाढवावी का याचाही विचार चालू आहे. दोन तीन दिवसात याचाही निर्णय आम्ही घेणार आहोत. ज्यांना हा ग्रंथ हवाच आहे आणि ज्यांनी तो अद्यापही बुक केलेला नाही त्यांनी ९००४० ३४९०३ या 'चिन्ह'च्या मोबाईलवर NKG 1 एव्हडा SMS स्वतःच्या इ-मेल आणि नाव पत्त्यासह पाठवून ठेवावा. जर प्रिंट ऑर्डर वाढवावायाचा निर्णय झालाच तर त्यांना २५०० रुपयांचा हा ग्रंथ १६५० रुपयातच मिळू शकेल. प्रकाशन सोहोळ्याच्या निमित्तानं आम्ही बराच मोठा घाट घातलाय पण त्याचा तपशील आज नाहीं तर ११ तारखेपासून रोजच देणार आहोत. असंख्य फेसबुक फ्रेंड्सनी हा ग्रंथ बुक केलाय, त्यामुळे आगामी घडामोडींचे सारेच तपशील आम्ही इथच पोस्ट करणार आहोत, वाचत रहा आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवा आणि सूचनाही.

No comments:

Post a Comment