Monday, March 17, 2014

वाजवा रे वाजवा !!!!




कालच्या' सकाळ'च्या बातमीतला " गायतोंडे " यांचा एकेरी उल्लेख खटकला .जरी तो ' एक मोठा चित्रकार ' असा बहुमानाने केलेला असला तरी,कदाचित ते माझे वाक्य आहे कि काय असा वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे, म्हणून हा 'केविलवाणा 'खुलासा, निदान फेसबुक किंवा ब्लोगवर येणाऱ्याचा तरी तसा समज होऊ नये म्हणून.

' गायतोंडे ' या ग्रंथाचे आधीचे नाव ' गायतोंडेंच्या शोधात … 'असे होते . 'चिन्ह'च्या २००६ साली गाजलेल्या अंकाचे शीर्षकही तेच होते. म्हणून ग्रंथालाही तेच देण्याचे निश्चित केले. पण त्या ' च्या ' मुळे गायतोंडे यांचा अनादर होतो आहे कि काय असे विचार मनात येवू लागले . एकदा नामवंत लेखक मुकुंद टांकसाळे देखील फोनवर म्हणाले की कि ते ' च्या ' डोळ्यांना जरा खटकतं बरं का ! कानालाही बरं नाही वाटत.'
पण बाण तर सुटला होता , आर्ट वर्क देखील झालं होतं. त्याची सर्वत्र प्रसिद्धी देखील झाली होती. जवळ जवळ वर्षभर आम्ही ते तसेच वापरत होतो.




पण आता अगदी अलीकडे ग्रंथ संपूर्ण डिझाईन झाल्यावर जेव्हा एकदा वाचला तेव्हा मात्र पुन्हा एकदा ते विचार प्रबळ होऊ लागले आणि ग्रंथाचे कव्हर आम्ही बदललेच . अगदीच राहवले नाही म्हणून या साऱ्या भावना सकाळ मधली ती बातमी देणाऱ्या श्रद्धाच्या कानावर घातल्या तर तिनेही दिलगिरी व्यक्त केली , म्हणाली ते सारे अनावधाने झाले, वगॆरे पण ते जर सोडले तर ती बातमी मात्र अगदी दणदणीत होती यात शंकाच नाही .

गायतोंडे गेल्यावर आधी २००१ साली , नंतर त्याचं चित्र लिलावात विक्रमी किमतीला गेल्यावर प्रथम २००६ आणि नंतर २००७ साली आणि आता गेली ७-८ वर्षे हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही जे परिश्रम घेतो आहोत ते आता हळू हळू आपला रंग दाखवू लागले आहेत . नाहीतर ज्या बहुसंख्य वृत्तपत्रांनी गायतोंडे यांच्या निधनाची साधी बातमी देखील मिस केली त्या साऱ्याच वृत्तपत्रांकडून या ग्रंथाला इतकी प्रसिद्धी का बरं दिली जावी ?

येssssssस , आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की
हा ग्रंथ अदभूत झालाय , अगदी भन्नाटच झालाय ……
आणि हा ग्रंथ मराठी प्रकाशनांच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारच . .
फक्त आणखी थोडीशी काळ काढा , आम्ही तो अगदी वाजत गाजत घेवून येतोय …
अरे वाजवा रे वाजवा ………………….

No comments:

Post a Comment