Tuesday, December 24, 2013

गोष्ट गायतोंडेंच्या फिल्मची ….


      'गायतोंडे' यांच्या वरची फिल्म सुनील काळदाते करत होता तेव्हाची गोष्ट . शूटिंगच्या पहिल्या दिवशी कोलते सरही हजर होते . त्यांच्या स्टुडीओ मध्ये सर्वच वस्तूंवर पसरलेली ती प्रचंड धूळ पाहून आता हे सारे फिल्ममध्ये शूट होणार हे जाणून ,अस्वस्थ होऊनकोलतेसरांनी एक डस्टर हाती घेऊन ती पुसायला सुरवात केली, तर ते पाहून गायतोंडे म्हणाले 'कोलते', ते तसंच राहूदे , पुसायच नाही, मला तसंच आवडतं 'कोलते सर सांगतात 'मला जी घाण वाटत होती तो राखाडी धुळीचा थरत्यांच्या दृष्टीनं जणू "सिल्व्हर "होता असंच वाटलं मला क्षणभर .त्यांनी ज्या तातडीने मला रोखलं ते पाहून , त्याच क्षणी मला त्यांच्या पेंटिंग मधला तो अगम्य सिल्व्हर आठवला , जो कुठून येत होता हे मला कळलं नव्हतं तो सिल्व्हर. 'सुनील काळदाते पण ग्रेटच त्यानं ते सारं जसंच्या तसं शूट केलं ,आणि 'गायतोंडे 'यांच्यावर एक अजरामर फिल्म तयार झाली ,जी पुढे जगभरच्या फिल्म फेस्टिवल्स मध्ये प्रचंड गाजली .सुनील एकदा सांगत होता...पेंरिस बीएनालेत तर जगभरातील ८०० फिल्म मधून ज्या ४० फिल्मनिवडल्या गेल्या त्यात ती होती . परदेशात जिथे जिथे ती दाखवली गेली तिथे तिथे प्रेक्षकांनी फिल्म संपल्यावर उभं राहून मानवंदना दिली. सुनीलने शूटिंगचा साराच अनुभव गायतोंडे यांच्या वरच्या 'चिन्ह ' च्याआगामी पुस्तकात शब्दांकित केला आहे .   त्याच फिल्म मधले हे प्रकाशचित्र . 


No comments:

Post a Comment