Wednesday, December 25, 2013

पुन्हा नामकरण

     अखेर आम्ही गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाचं नाव बदललंच . आता हा ग्रंथ " गायतोंडे " या नावानेच ओळखला जाईल . रूढार्थाने "गायतोंडे "यांचे चरित्र नव्हे ,गायतोंडे यांनी कुणालाच फारसं जवळ येवू दिलं नाही ,जे काही त्यांच्या आयुष्यात प्रसंग परत्वे आले ,त्यानाही त्यांनी कायम एका विविक्षित अंतरावरच ठेवलं ,त्यामुळे त्यांच्या विषयी सांगू पाहणाऱ्या ,लिहू पाहणाऱ्याना त्यांना ठाऊक असलेलेच "गायतोंडे "लेखनातून मांडता येतात. (याला अपवाद ठरू शकेल ते त्यांची मॆत्रीण ममता सरन याचं लिखाण ,पण पुस्तक काही येतच नाहीये ,आता त्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ते येईल असे सांगितले जाते ,तसे जर झाले तर ती आनंदाचीच गोष्ट ठरेल.) म्हणूनच "गायतोंडे" यांच्यावरचा अंक प्रसिद्ध करताना त्याला समर्पक असे "गायतोंडेंच्या शोधात…." हे समर्पक शीर्षक योजले होते. त्यांच्या वरच्या ग्रंथाला म्हणूनच तेच शीर्षक नक्की केले . पण आता इतक्या दिवसांच्या शोधाच्या प्रवासात एका क्षणी असे लक्षातगायतोंडे यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तुत्व इतकं विराट आहे की 'यांच्या नावापुढे 'च्या'लावल्या मुळे अभावितपणे आपल्याकडून अवमान तर होत नाही ना ?मध्यंतरी मुकुंद टांकसाळे यांचा फोन आला होता ,त्यांनी ही तीच शंका बोलून दाखवली . पण आता सारे कसे बदलावयाचे म्हणून ते सारे तसेच राहिले ,पण सुनील काळदाते यांची फिल्म पुन्हा पहिली आणि तत्काळ निर्णय घेतला ,कि आता नामकरण करायचेच आणि आम्ही ग्रंथाचे पुन्हा नव्याने नामकरण केले . "गायतोंडेंच्या शोधात …… " एवजी सदर ग्रंथ आता " गायतोंडे " या नावाने ओळखला जाईल .

No comments:

Post a Comment