गायतोंडे उवाच …
भाग ३
भाग ३
मुलाखतीच्या वेळी समोरून आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गायतोंडे अतिशय मोजक्याच शब्दात देतात. त्या तुम्ही कधीही वाचा, त्यात तुम्हाला नक्कीच काहीना काही गवसून जाईल. अतिशय गांभीर्यानं उत्तर देणारे गायतोंडे काही प्रश्नांना जी मिश्किल उत्तरं देतात ती वाचल्यावर तुम्ही नक्कीच हसत सुटता. उदा. पुढील प्रश्नोत्तरात दिलेलं चौथं प्रश्नोत्तर पहा. गायतोंडे यांचं दिल्लीतलं सर्वच आयुष्य बरसातीत गेलं. बरसाती म्हणजे छोट्या इमारतींमधली नोकराचाकरांसाठी बांधलेली छोटीशी खोली. गायतोंडे यांनी दिल्लीच्या संपूर्ण वास्तव्यात अशाच दोन खोल्यांचा स्टुडिओ म्हणून वापर केला. काळदाते यांनी चित्रित केलेल्या फिल्ममधल्या त्यांच्या स्टुडीओचं दर्शन होताच पाहणारा हादरून जातो. अशा गच्चीतल्या जागेत उन्हाळ्यात दिल्लीचं तापमान ४०-४५च्या वर गेल्यावर काम करणं केवळ अशक्य असे. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गायतोंडे मात्र मिश्किलपणे उत्तर देतात 'कपडे काढून काम करतो.'
'गायतोंडे' ग्रंथातील पुढील प्रश्नोत्तरे पहा...

: नाही, त्या काहीच शिल्लक राहिल्या नाहीत. आता खरं तर काहीच आठवत नाही. खरं सांगायचं तर महत्वाकांक्षा अशी मी कधी बाळगलीच नाही. आयुष्य जसं जसं समोर येत गेलं तसा तसा मी जगत गेलो.
: आयुष्यात काही मिळवलंय असं समजता ?
: मी ‘मी’ आहे. हे ‘मी’पण मी मिळवलं.
: स्वतःचं व्यक्तिचित्रणं कधी केलंय ?
: चित्रकार जे काही करतो ते त्याचं स्वचित्रणच (सेल्फ पोट्रेटच) असतं.
: मी ‘मी’ आहे. हे ‘मी’पण मी मिळवलं.
: स्वतःचं व्यक्तिचित्रणं कधी केलंय ?
: चित्रकार जे काही करतो ते त्याचं स्वचित्रणच (सेल्फ पोट्रेटच) असतं.

: कपडे काढून काम करतो.
: भविष्याबद्दल काही विचार केलाय ?
: काही नाही. जे आहे ते आहे. दिवस आहे तो दिवस आहे.
‘गायतोंडे’ ग्रंथाचा
प्रोमो पहायचा असेल किंवा निर्मितीची कथा सांगणारा २८ पानी विशेष लेख वाचायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा http://www.chinha.co.in/promo/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf
आणि ग्रंथ हवा असेल तर ९००४० ३४९०३ या नंबरवर
तुमचे नावं, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा.
No comments:
Post a Comment